Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

heavy rainfall in Mumbai suburbs today : मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काळ्या ढगांसह विजांच्या कडकडाटात पावसाची दमदार एन्ट्री झाली असून हवामान खात्याने पुढील काही तास पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Mumbai weather latest rain update
Mumbai weather latest rain update
Published On

Mumbai weather latest rain update : मुंबईकरांची अखेर पावसाची प्रतीक्षा संपली आहे. आज अचानक मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये हवामानात मोठा बदल झाला असून पावसाला सुरूवात झाली. सकाळपासूनच सुमारास आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुंबई आणि उपनगरात पावसाने धुवांधार एन्ट्री केली आहे. मुंबई, ठाणे, वसई, कल्याण आणि पनवेलसह मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

उपनगरांना झोडपले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, आज सकाळपासूनच अचानक पावसाला सुरूवात झाली. दादार, परळ, कुर्ला, घाटकोपर, तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पावसाचा वेग पाहता मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला आहे.

Mumbai weather latest rain update
Maharashtra Cabinet : मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ धडाकेबाज निर्णय, कुणाला होणार फायदा?

रेल्वे आणि रस्ते वाहतूक सध्यातरी पूर्ववत

पावसाचा जोर असला तरी सध्यातरी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, दृश्यमानता (Visibility) कमी झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुख्य हायवेजवर गाड्यांचा वेग मंदावला आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई आणि आसपासच्या परिसरात असाच मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai weather latest rain update
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा, कोणाचे कर्ज होणार माफ?

पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होणार

मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत हवामान बदलले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, मुख्य मान्सूनचा अंदाजही हवामान विभागाने कायम ठेवला आहे. उष्णता कमी झाली आहे मराठवाडा विदर्भ कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai weather latest rain update
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार, ठाकरेंच्या शिलेदाराच्या खुल्या ऑफरने नव्या समी‍करणाची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com