Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार, ठाकरेंच्या शिलेदाराच्या खुल्या ऑफरने नव्या समी‍करणाची चर्चा

Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अंबादास दानवे, अब्दुल सत्तार आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite
Uddhav Thackeray and Eknath Shinde reuniteSaam TV Marathi
Published On

Uddhav Thackeray Eknath Shinde Latest Political Update : उद्धव ठाकरेंच्या आमदार आणि खासदाराच्या वक्तव्याने आणि शिदेंसेनेच्या आमदाराने केलेल्या कृत्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे आणि शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर वक्तव्य केले. त्यातच आज खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या नेत्यांना खुली ऑफर दिली. या सर्व घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली. नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे? याबाबत जाणून घेऊयात...

२०२२ मध्ये शिवसेनेतील सर्वात मोठं बंड झालं होतं. पण आता चार वर्षांनी दोन्ही गट एकत्र येण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यांनी युतीची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेत दिलेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेना (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर आरोप करत असताना शिंदेंसोबतच्या युतीचे संकेत दिले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार म्हणाले की, भाजपने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे हातपाय तोडले आहेत, त्याचबरोबर तिचे शीरही कापले आहे.

दोन्ही नेते काय म्हणाले?

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे का? असा प्रश्न दोन्ही नेत्यांना थेट विचारण्यात आला. त्यावेळी त्यांचा प्रतिसाद प्रचंड सकारात्मक होता. उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे म्हणाले, "मला अनेक प्रसंगी असे वाटते. पण केवळ माझ्या इच्छेने काहीही साध्य होणार नाही; दोन्ही बाजूंनी तशी इच्छा असली पाहिजे." शिवसेनेचे अब्दुल सत्तार म्हणाले, "आपण एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे. जर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमत झाले, तर दोन्ही पक्षांना एकत्र यायला जास्त वेळ लागणार नाही."

Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

संजय राऊतांची शिंदे गटाला खुली ऑफर?

"शिवसेना सोडून गेलेल्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत," असं आतापर्यंत उद्धव ठाकरे गटाकडून (UBT) छातीठोकपणे सांगितलं जात होतं. मात्र, आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी थेट शिंदे गटातील आमदारांना आणि नेत्यांना 'मातोश्री'वर परत येण्याची खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत शिंदे गटाला साद घातली आहे. "ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष सध्या (शिंदे गटाचे) मर्दन करतोय, त्यांना अपमानित करतोय, ते पाहता जर कोणाला वाटत असेल की आपल्याकडून चूक झाली आहे, आपल्याला भ्रमात ठेवलं गेलं आणि आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत यायला पाहिजे," असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite
ठाकरे-पवारांसारखा आणखी एक पक्ष फुटणार, ५० आमदार बंडखोरीच्या तयारीत, राजकारणात खळबळ

...तर मातोश्रीवर या आणि उद्धवजींना भेटा!

पुढे बोलताना राऊत म्हणाले, "ज्यांना आता अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांचा आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे आणि हा केवळ शेठजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे; अशी जाणीव जर कोणाला झाली असेल, तर त्यांनी खुशाल मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींची भेट घ्यावी." दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानामुळे शिंदे सेनेतील आमदारांसाठी ठाकरे सेनेने आपले दरवाजे पुन्हा उघडले की काय? असा मोठा सवाल आता उपस्थित होत आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde reunite
Accident : पुणे-सातारा महामार्गावर भयंकर अपघात, २ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com