Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

Pune Nashik railway project: जीएमआरटीच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पुणे-नाशिक रेल्वेमार्गात तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. उरळी, वाघोली आणि अहिल्यानगरमार्गे नवीन मार्ग निश्चित करण्यात आला असून १४ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवास अधिक जलद होणार आहे.
Pune Nashik Railway
Pune Nashik Railwaysaam tv
Published On

‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण’ (जीएमआरटी)च्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा बदल केलाय. आता हा रेल्वेमार्ग उरळी, वाघोली आणि अहिल्यानगरमार्गे नाशिकपर्यंत जोडला जाणार आहे.

हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे-नाशिक दरम्यान दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येणार असून या मार्गावर रेल्वे ताशी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल.

Pune Nashik Railway
CSMT स्टेशन फलाट विस्ताराच्या कामाचा कालावधी वाढला; अनेक गाड्यांचा शेवटचा थांबा बदलला, कोणती ट्रेन कुठे थांबणार?

सुरुवातीला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जीएमआरटीच्या परिसरातून नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर हा मार्ग बदलून जीएमआरटीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर नेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतरही पुन्हा एकदा मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूने रेल्वेमार्ग उभारण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र तो पर्याय व्यवहार्य नसल्याने आता उरळी आणि वाघोलीमार्गे नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

या नव्या आराखड्यानुसार, रेल्वेमार्ग जीएमआरटीच्या जवळून जाणार नाही. पुणे आणि नाशिकदरम्यानचा नवीन रेल्वेमार्ग अंतिम करण्यात आला असून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Pune Nashik Railway
देशात आणखी एक बुलेट ट्रेन धावणार, तब्बल 1500 किमी प्रवास फक्त 6 तासांत

असा असणार नवीन रेल्वेमार्ग

  • पुणे ते उरळी – सध्या अस्तित्वात असलेला मार्ग

  • उरळी ते वाघोली – नवीन रेल्वेमार्ग

  • वाघोली ते अहिल्यानगर – नवीन रेल्वेमार्ग

  • अहिल्यानगर ते पुणतांबा – नवीन रेल्वेमार्ग

  • पुणतांबा ते शिर्डी – सध्या वापरात असलेला मार्ग

  • शिर्डी ते नाशिक – नवीन रेल्वेमार्ग

Pune Nashik Railway
Mumbai’s coastal road: मुंबई कोस्टल रोडचा गेमचेंजर कॉरिडोर; मरिन ड्राईव्ह ते भाईंदर होणार बुलेटच्या वेगाने प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com