देशात आणखी एक बुलेट ट्रेन धावणार, तब्बल 1500 किमी प्रवास फक्त 6 तासांत

Delhi Siliguri Bullet Train 1500km Project Approved: दिल्ली ते सिलीगुडी दरम्यान 1500 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या हायस्पीड रेल्वेमुळे प्रवास केवळ 6 तासांत पूर्ण होणार असून पूर्व भारताच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Proposed high-speed bullet train corridor connecting Delhi to Siliguri set to transform travel in eastern India.
Proposed high-speed bullet train corridor connecting Delhi to Siliguri set to transform travel in eastern India.saam tv
Published On

पश्चिम बंगालमध्ये गेल्याच महिन्यात भाजपचा दणदणीत विजय झाला आणि सूवेंदु अधिकारी हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. सरकार स्थापन होताच बंगालमध्ये भाजप सरकार मोठमोठे निर्णय घेताना दिसत आहे. अशातच शनिवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पश्चिम बंगालमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली. दिल्ली ते सिलीगुडी असा हा बुलेट ट्रेनचा प्रकल्प असणार आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, दिल्ली ते सिलीगुडी दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित असून हा हाय स्पीड कॉरीडोर केवळ 6 तासांत प्रवास पूर्ण करेल. हा मार्ग लखनऊ, वाराणसी आणि पटना मार्गे जानर आहे. या प्रकल्पामुळे पूर्व भारताच्या कनेक्टीव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.

Proposed high-speed bullet train corridor connecting Delhi to Siliguri set to transform travel in eastern India.
अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा खजिना मिळाला! केंद्र सरकारकडून व्हिडीओ शेअर; भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळ

तसेच कोलकत्ता मेट्रोसाठी पुढील पाचवर्षांत नवीन 60 ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वैष्णव यांनी सांगितले की, 2014 पूर्वी फक्त 28 किमी मेट्रोचे जाळे पसरले होते. त्यानंतरच्या काळात 45 किमी आणखी नवीन मार्ग जोडले गेले आहेत. आता मेट्रोचे जाळे वाढवले जाणार असून विशेष या सर्व मेट्रो अनेक नवीन बदलासह प्रवाशांना मिळणार आहे.

Proposed high-speed bullet train corridor connecting Delhi to Siliguri set to transform travel in eastern India.
Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

मुख्यमंत्री सूवेंदु अधिकारी यांनीही मोठी घोषणा करत सांगितले की, राज्यात सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर टाइमलाइन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा सरकारचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

Proposed high-speed bullet train corridor connecting Delhi to Siliguri set to transform travel in eastern India.
महिलेच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय, राजकीय वर्तुळात खळबळ

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील सुधारलेल्या संबंधांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैष्णव यांनी राज्य सरकारच्या सहकार्याचे स्वागत करत सांगितले की, जमीन अधिग्रहण आणि मंजुरी प्रक्रियेत सहकार्य मिळाल्यास प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात. एकूणच, बुलेट ट्रेनपासून मेट्रो विस्तारापर्यंतच्या या घोषणांमुळे पश्चिम बंगालच्या पायाभूत विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com