Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

FUEL PRICE HIKE IN INDIA : कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे इकडे भारतात पेट्रोल-़डिझेल्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. अशात पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत
FUEL PRICE HIKE IN INDIA Saam Tv
Published On
  • पेट्रोल -डिझेल दर ९ रुपयांनी वाढणार

  • इंधन दरवाढीमुळे महागाई वाढणार

  • पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा होत आहे

  • पेट्रोल डिझेलच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार

पेट्रोल- डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ६ ते ९ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांना दररोज ५५० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. या कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ही दरवाढ टप्प्या टप्प्याने केली जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ६ ते ९ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांना दररोज ५५० कोटींचा तोटा होत आहे. कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही दरवाढ केली जाणार आहे. दरवाढ एकाच वेळी न होता आगामी काळात टप्प्या टप्प्याने होणार आहे. इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढून महागाईत अधिक वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आला आहे.

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

१५ मेपासून पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात प्रति लिटर ७.५० रुपयांपर्यंत वाढ होऊनही दररोज ६०० कोटींचा तोटा तेल कंपन्यांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा तोटा किंवा तेल कंपन्यांच्या भाषेमध्ये अंडर रिकव्हरी म्हणून ओळखला जाणारा तोटा भरपूर काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आगामी काढात वाढ होऊ शकते. ही दरवाढ साधारण ९ ते १० रुपयांपर्यंत असू शकते.

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

१५ मे पूर्वी तेल कंपन्यांचा दावा होता की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे त्यांना दररोज १,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या १२ दिवसांत प्रति लिटर ७.५ रुपयांची दरवाढ झाल्यानंतर त्यांचे नुकसान १,००० कोटी रुपयांवरून ६०० कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती आणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com