पुढच्या महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर होणार; काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Petrol-Diesel Price: महाराष्ट्रात सुरू असलेल्या इंधनाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचे दर १५० रुपयांपर्यंत आणि डिझेलचे दर १७० रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यात इंधन टंचाई जाणवत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी तर पंप बंद पडली आहेत. इंधन टंचाई असतानाच पेट्रोल-डिझेलचे दर वाढू लागले आहेत. त्याच दरम्यान आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धडकी भरवणारा दावा केला आहे. पुढील महिन्यात किंवा दीड महिन्यात पेट्रोल १५० तर डिझेल १७० रुपये लिटर होईल. ज्या पद्धतीने देश चालवला जातोय.

हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणार आहे. याला मारण्यासाठी ते सरकार आलेलं आहे. यावेळी वडेवट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. सरकार इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगते. केंद्रीय मंत्र्यांकडून तुटवडा नाही असं सांगितलं जाते, मग आरसी बुक पाहून डिझेल का दिलं पाहिजे. शेतकरी ट्रॅक्टर कशासाठी वापरतो त्याला आरसी बुक पाहून डिझेल दिलं जातंय म्हणजे तुटवडा आहे, असं विजय वडेवट्टीवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com