Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

Fuel shortage In Maharashtra: राज्यात इंधन टंचाईचं संकट आहे. इंधनटंचाईमुळे दरवाढीचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं गृहखर्चाचं बजेट कोलमडलं.
Petrol-Diesel Price Hike:  इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Diesel Price Hike google
Published On
  • महाराष्ट्रात इंधन टंचाई

  • पेट्रोलचा दर 111 रुपयांवर तर डिझेलचा दर 97 रुपयांवर पोहोचला

  • इंधन महागाईमुळे गृहखर्च, प्रवास आणि दैनंदिन गरजांचे बजेट कोलमडलं

  • वाढत्या दरांमुळे बाईक आणि कार चालकांचा मासिक खर्च वाढला

राज्यातील जनतेला इंधन दरवाढीमुळे आपली जमापुंजी खर्ची घालावी लागतेय की काय, अशी सद्यस्थिती आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर होण्याची चिन्हे आहेत. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

राज्यातल्या विविध जिल्ह्यांत इंधन तुटवड्यासह दरवाढीनंही सर्वसामान्य नागरिक चांगलाच हैराण झालाय. तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ केलीये. राज्यात पेट्रोलचे दर 111.21 रुपये तर डिझेल दर 97.83 रुपयांवर पोहोचलेत. वाढत्या इंधनांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील बोजा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अशातच इंधन दरवाढीमुळे दैनंदिन व्यवहाराचं गणित कसं बिघडतं पाहूयात.

Petrol-Diesel Price Hike:  इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

समजा, मुंबईतील बाईक चालवणारा महिन्याला 30 लीटर पेट्रोल वापरत असेल तर आधीच्या दरानुसार 94.37 रुपये प्रति लीटर दरानं महिन्याचा खर्च 2843 रुपये इतका होतो. मात्र, सद्यस्थितीस मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये लीटर असून बाईक वाल्यांना महिन्याला 3,336 रुपये खर्च करावे लागणार आहे. म्हणजे ४९३ रुपये अधिक खर्च होताहेत.

Petrol-Diesel Price Hike:  इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; १० दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबई पुण्यासह महत्त्वाच्या शहरातील नवे दर

तर दुसरीकडे एक कार चालवणारा महिन्याला 60 लीटर पेट्रोल वापरत असेल तर त्याला दरवाढीआधी महिन्याला 5686 रुपये खर्च करायला लागायचा. मात्र, आता त्याच कारचालकाला महिन्याला 6672 रुपये मोजावे लागताहेत. म्हणजे कारचालकाला 986 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

Petrol-Diesel Price Hike:  इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ प्रत्यक्षात जरी साडेसात रुपयांची दिसत असली तरी त्याचे परिणाम इतर अनेक गोष्ठींवर होत असतात. संपूर्ण पुरवठा साखळीच यामुळे बिघडली जाते.मुलांचं शिक्षण, वह्या पुस्तकं, भाजीपाला, खाद्यपदार्थांचे दर, प्रवास खर्च यासगळ्या गोष्टींवर या इंधन दरवाढीचा परिणाम होताना दिसतोय..आणि एकदा वाढलेले दर नंतर कमी होत नसतात..त्यामुळे दरवाढीच्या या चक्रव्यूहात सर्वसामान्य पूर्णपणे अडकून पडणार आणि त्यांच जगण दिवसेंदिवस महाग होत जाणार हे निश्चित.

Petrol-Diesel Price Hike:  इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत
Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com