Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; १० दिवसांत चौथ्यांदा वाढ, पाहा मुंबई पुण्यासह महत्त्वाच्या शहरातील नवे दर

Today petrol diesel rates : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. दोन आठवड्यांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या आजचे नवीन पेट्रोल-डिझेल दर आणि कारणे.
PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONSSaam Tv
Published On

Petrol diesel price hike Mumbai Pune Nashik: पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका पुन्हा एकदा उडाला आहे. मागील ४ दिवसात इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आधीच जवळपास एक हजार रूपयांची वाढ झाली होती. त्यात आता चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किंमती (Petrol And Diesel Prices Rise) वाढल्या आहेत. आजपासून पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये ७३ पैसे, पॉवर पेट्रोल २ रुपये ७३ पैसे तर डिझेल दोन रुपये ८१ पैशांने वाढले आहे.

१५,१९ आणि २३ मे आणि २५ मे अवघ्या दहा दिवसात चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांच्या इंधन खर्चात प्रतिलीटर सुमारे ८ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या शहरात ऑटो, टॅक्सीच्या दरातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याशिवया जून महिन्यापासून एसटीच्या तिकिटातही वाढ होण्याचे संकेत प्रताप सरनाईकांनी दिले आहेत. दिल्लीत डिझेलचा दर ९५.२० रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल २.७६ रूपये वाढले असून मुंबईत पेट्रोल १११.२१ रूपये प्रति लीटर, तर डीझेल २. ८१ रूपयांनी वाढून ९७.८३ रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. (Petrol And Diesel Prices Rise Mumbai pune)

PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
Accident : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून,वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कररचनेतील बदल यामुळे दरवाढ झाल्याची शक्यता. नवीन दरानुसार पेट्रोल २ रुपये ७३ पैशांनी तर डिझेल २ रुपये ८१ पैशांनी महागले आहे. पुणे विभागात आज सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल, डिझेल आणि प्रीमियम पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

नवीन दर पुढीलप्रमाणे लागू झाले आहेत

पेट्रोल : १०८.७९ वरून १११.५२ प्रति लिटर

डिझेल : ९५.३४ वरून ९८.१५ प्रति लिटर

प्रीमियम पेट्रोल : ११७.८० वरून १२०.५३ प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल: २.७२ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: १११.७० रुपये

डिझेल: २.८१ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ९८.७६ रुपये

सोलापूर

पेट्रोल: २.७३ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: १११.८७ रुपये

डिझेल: २.८१ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ९८.५५ रुपये

कोल्हापूर

पेट्रोल: २.४१ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: १११.७७ रुपये

डिझेल: २.३८ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ९८.४६ रुपये

भंडारा

पेट्रोल: २.७२ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ११२.३२ रुपये

डिझेल: २.८१ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ९८.९९ रुपये

बुलढाणा

पेट्रोल: २.७२ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ११२.४९ रुपये

डिझेल: २.८१ रुपयांनी वाढले

सध्याचा दर: ९९.१६ रुपये

PETROL AND DIESEL RATES RISE AGAIN AMID MIDDLE EAST TENSIONS
Accident : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

मागील १० दिवसात अशी झाली दरवाढ -

१५ मे

पेट्रोल : ३.१६

पॉवर पेट्रोल : ३.१४

डिझेल : ३.१०

१९ मे

पेट्रोल : ०.९१

पॉवर पेट्रोल : ०.९१

डिझेल : ०.९४

२३ मे

पेट्रोल : ०.९०

पॉवर पेट्रोल : ०.९०

डिझेल : ०.९५

आज २५ मे

पेट्रोल : १०८.७९ वरून १११.५२ प्रति लिटर

डिझेल : ९५.३४ वरून ९८.१५ प्रति लिटर

प्रीमियम पेट्रोल : ११७.८० वरून १२०.५३ प्रति लिटर

इंधन दरवाढीची कारणं काय आहेत?

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन

  • केंद्र सरकारचा उत्पादन शुल्क

  • ओपेक देशांचे उत्पादन धोरण

  • जागतिक राजकीय अस्थिरता

  • युद्धजन्य परिस्थिती आणि निर्बंध

  • तेल उत्पादक देशांकडून पुरवठ्यात कपात

  • तेल कंपन्यांचा वाहतूक व वितरण खर्च

  • बंदरे, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक खर्चातील वाढ

  • इंधन वितरण साखळीतील अडथळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com