पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Mumbai Metro Monorail Local Interchange Chembur Station: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! चेंबूर येथे मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वे एकाच ठिकाणी जोडल्या जाणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
Chembur set to become Mumbai’s major transit hub connecting Metro Line 2B, Monorail, and Suburban Rail for seamless commuting.
Chembur set to become Mumbai’s major transit hub connecting Metro Line 2B, Monorail, and Suburban Rail for seamless commuting.saam tv
Published On

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील प्रवाशांना मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वे असे प्रवासाचे तीन पर्याय उपलब्ध होणार आहे. मेट्रो लाइन 2 बी वरील चेंबुर स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. मोनोरेल आणि रेल्वे स्थानक या मेट्रो स्थानकाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे या मार्गावर एक इंटरचेंज निर्माण झाले आहे. यामुळे रोजच्या लोकलच्या धावपळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

Chembur set to become Mumbai’s major transit hub connecting Metro Line 2B, Monorail, and Suburban Rail for seamless commuting.
Baramati By Poll Result: सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय, अजितदादांचा बारामतीमधील रेकॉर्ड मोडला; किती मतं मिळाली?

MMRDA चे आयुक्त संजय मुखर्जीनी चेंबुर मेट्रो स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासह MMMOCL चे संचालक कान्हूराज बगाटेही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी व्ही.एन.पुरव मोनोरेल स्थानकाची पाहणी केली. या दोन्ही स्थानकादरम्यान इंटरचेंज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी मोनोरेल आणि मेट्रो या दोन्ही मार्गांवरून सहजपणे प्रवास करू शकतील. यामुळे मोठा मुंबई कनेक्टीव्हिटीसाठी मोठा फायदा होणार असून मुंबई दक्षिण आणि मध्य उपनगरांशी जोडण्यात येणार आहे.

Chembur set to become Mumbai’s major transit hub connecting Metro Line 2B, Monorail, and Suburban Rail for seamless commuting.
Crime : संशयाचे भूत डोक्यात शिरले; पतीने पत्नीच्या डोक्यात टीव्ही फोडला, ठाण्यातील भयंकर घटना

मेट्रो लाईन २बी चे वायबुर स्टेशन सुरू झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या, डायमंड गार्डन ते मंडाले या ५.४ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात पाच स्थानके कार्यरत आहे. मात्र प्रवासी संख्या अपेक्षित पाहिजे तितकी वाढली नाही. परिवहन अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, चेंबूर स्टेशन पूर्ण झाल्यावर त्यात झपाट्याने बदल होईल, कारण ते उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेलला जोडणारे पूर्व मुंबईतील सर्वात मोठे इंटरचेंज केंद्र बनेल.

Chembur set to become Mumbai’s major transit hub connecting Metro Line 2B, Monorail, and Suburban Rail for seamless commuting.
MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि चेंबुर-मानखुर्दसह आजूबाजूच्या परिसरातील ट्राफिक कमी होण्यास मदत होईल. MMRDA सप्टेंबर 2025 पासून स्थगित असलेली मोनोरेल सेवा पावसाळ्यापूर्वी पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहे. 19.54 किलोमीटर लांबीच्या मोनोरेल कॉरीडॅारला मेट्रो २ बीशीा जोडल्याने त्याची संख्या वाढण्याचीही अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com