MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Vikram Kakade Pune MLC Election : पुणे विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजपचे नेते विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच महायुतीकडून उमेदवारी मिळवली.
mahayuti
mahayutiSaam Tv
Published On

Vikram Kakade joins NCP before nomination filing : पुण्यातील विधान परिषदेसाठी उमेदवार कोण? यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. विक्रम काकडे यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. विक्रम काकडे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. थोड्याच वेळात ते उमेदवारी अर्ज भरतील. काकडे यांचं नाव निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना विरोध दर्शवण्यात आला होता.. बाहेरून आलेला उमेदवार नको, अशी भूमिका पक्षातील काही नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.

विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिले. पण उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेच नव्हते. जवळपास चार तासांच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विक्रम काकडे यांचं नाव पक्षातून निश्चित झाल्यानंतर इच्छूक उमेदवार सुनील टिंगरे नाराज असल्याचे समोर आले आहे. ते वेगळा निर्णय घेणार का? असा सवाल उपस्ंथित केला जातोय.

mahayuti
Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

राष्ट्रवादीमध्ये एका नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी जिजाईवर तब्बल ४ तास बैठक झाली. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार शंकर मांडेकर, आमदार चेतन तुपे हेही उपस्थित होते. विक्रम काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरतील.

mahayuti
Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत निश्चित झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आज ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाली आहे. थोड्याचवेळात ते उमेदवारी अर्ज भरतील. विक्रम काकडे हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते पुण्यातून मैदानात उतरणार आहेत. पुण्यात विक्रम काकडे विरूद्ध श्रीकांत पाटील, अशी लढत होणार आहे.

mahayuti
Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com