Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?

Sangli Crime News : सांगलीतील करोली टी येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचा बनाव करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता.
Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?
Sangli Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • सांगलीत पत्नीने प्रियकरासह पतीचा खून केला

  • आत्महत्येचा बनाव करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न

  • १२ दिवसांनी पोलिस तपासात सत्य उघड

  • पत्नी, प्रियकर व मुलांविरोधात गुन्हा दाखल

Sangli Crime News सांगलीच्या करोली टी येथे अनैतिक संबंधात अडसरा ठरणाऱ्या पतीचा एक पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. धक्कादायक म्हणजे स्वतःचा गुन्हा उघड होऊ नये म्हणून महिलेने आत्महत्येचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर या महिलेने मुलांच्या मदतीने पतीवर अंत्यसंस्कार देखील उरकून घेतल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर जगात माणुसकी उरली नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव भरत करपे असे आहे, तर त्यांच्या पत्नीचे नाव निलाबाई करपे असे आहे. नीलाबाईचं बाबाजी करपे या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. मात्र ते भरत यांना मान्य नव्हते. प्रेमसंबंधात सतत अडथळा निर्माण करणाऱ्या भरत करपे यांना त्यांच्या पत्नीने मारण्याचा कट रचला.

Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?
Pune : ट्रायल रुममध्ये कॅमेरा लावला, कपडे बदलताना महिलेचा व्हिडीओ बनवला; पुण्यातील धक्कादायक प्रकार

२८ मार्च रोजी नीलाबाईने आणि तिच्या प्रियकराने भरत यांना मारहाण करत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास लावून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने व प्रियकराच्या साथीने रुग्णालयात दारू पिऊन मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार केले होते.

Crime News : बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव; १२ व्या दिवशी असा झाला भंडाफोड?
Shocking : हॉटेलमधील अन्न खात असाल तर सावधान! मंचुरियन आणि पनीर कढाई खाऊन एकाचा मृत्यू, दोघे गंभीर; नेमकी घटना काय?

मात्र १२ दिवसांनी कवठेमहांकाळ पोलिसांना सदर घटनेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी,या प्रकरणी तपास केला. या तपासात पत्नीनेच आपल्या पतीचा अनैतिक संबंधात अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आले. त्याचबरोबर खूनाच्या घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामध्ये दोन्ही मुलांनी देखील मदत केल्याचं उघडकीस आले आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये पत्नी व मुलांसह प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com