पुण्यात ट्रायल रूममध्ये गुप्त चित्रीकरणाचा प्रकार
दुकानमालकाकडून CCTV चा गैरवापर
महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
Pune Shop Owner Arrested for Filming Woman in Trial Room Using CCTV तुम्हीदेखील दुकानात जाऊन कपड्यांची खरेदी करत असाल तर सावधान! विद्येचं माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुण्यात एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुकेश मुथा या आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला. दुकानमालक मुकेश मुथाने सदर पीडित महिलेला कपडे बदलण्यासाठी स्टोअररूममध्ये पाठवले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची माहिती असूनही, आरोपीने जाणीवपूर्वक तिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत, विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७७ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीने पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.