Shocking : भाजीत केस आढळल्याने नवऱ्याकडून बेदम मारहाण, २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; संभाजीनगर हादरले

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. पतीकडून मारहाण व हुंड्यासाठी दबाव असल्याचा आरोप असून पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे.
Woman dies by suicide in Sambhajinagar following alleged domestic abuse and dowry harassment; seven accused arrested by police
Sambhajinagar Ishwari Bankar Sucide NewsSaam tv
Published On
Summary
  • संभाजीनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या; परिसरात खळबळ

  • पती व सासरकडून सतत छळ आणि मारहाणीचे आरोप

  • हुंड्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप

  • पोलिसांकडून ७ जणांना अटक

माधव सावरगावे, संभाजीनगर

Sambhajinagar Ishwari Bankar Sucide News पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना संभाजीनगरमध्ये एका महिलेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून निर्दयी पतीने महिलेला जखमी होईपर्यंत मारहाण केली असल्याचं उघड झालं आहे. ईश्वरी बनकर असे या महिलेचं नाव असून याप्रकरणी छावणी पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय ईश्वरीचा २८ जून २०२० रोजी अजय अशोक बनकर याच्यासोबत विवाह झाला. ते भावसिंगपुऱ्यातील श्रावस्ती कॉलनीत कुटुंबियांसोबत राहत होते. अजय रोज दारू पिऊन घरी येत ईश्वरीला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करत होता. सासरकडील अन्य नातेवाईकही सातत्याने घरी येऊन तिला त्रास देत होते. ईश्वरीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यांनी दोघांची समजूत काढून एकत्र राहण्याचा सल्ला दिला. मात्र, अजयच्या वागण्यात बदल झाला नाही.

Woman dies by suicide in Sambhajinagar following alleged domestic abuse and dowry harassment; seven accused arrested by police
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी मुलीचे लग्न थाटामाटात लावले होते. अजयला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, २ तोळ्याची साखळी, मुलीसाठी ५ तोळे सोने, २ लाख रुपये हुंडा, फ्रिज, कूलर सोफा व सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही अजय माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. त्याने विकत घेतलेल्या प्लॉटचे हप्तेही तिच्या वडिलांनाच भरण्याची मागणी करीत होता.

Woman dies by suicide in Sambhajinagar following alleged domestic abuse and dowry harassment; seven accused arrested by police
Pune : पुण्यात धक्कादायक प्रकार! व्हॉट्सॲपवर ग्रुप जॉईन करणं पडलं महागात, बँक खात्यातील १२ कोटी गायब

इतकंच काय तर भाजीत केस निघाल्याच्या कारणावरून निर्दयी अजयने ईश्वरीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती जबर जखमी झाली. पतीसह सासरच्यांकडून सुरू असलेला छळ असह्य झाल्याने ईश्वरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. तसेच ७ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अजून किती वैष्णवी आणि ईश्वरीचा अशाप्रकारे बळी जाणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com