स्वावलंबनाचा गाजावाजा, पण हातात भंगार रिक्षा; ‘पिंक रिक्षा’ योजनेत ४०० कोटींचा महाघोटाळा

Pink Rickshaw Scheme Scam: महाराष्ट्रातील ‘पिंक रिक्षा’ योजनेत ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. निकृष्ट ई-रिक्षांमुळे महिला लाभार्थी आर्थिक व सुरक्षिततेच्या संकटात सापडल्या असून तांत्रिक ऑडिटची मागणी जोर धरत आहे.
Women beneficiaries protest against alleged substandard e-rickshaws under the Pink Rickshaw Scheme in Maharashtra.
Women beneficiaries protest against alleged substandard e-rickshaws under the Pink Rickshaw Scheme in Maharashtra.Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पिंक रिक्षा’ योजनेत गंभीर तांत्रिक उल्लंघन आणि कोट्यवधींच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. ४०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेत (RFP) नमूद केलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन करून लाभार्थी महिलांना सुरक्षिततेची कोणतीही खात्री नसलेली निकृष्ट वाहने पुरवण्यात आली आहेत, असा दावा बाबा कांबळे यांनी केला आहे.

Women beneficiaries protest against alleged substandard e-rickshaws under the Pink Rickshaw Scheme in Maharashtra.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

नेमके प्रकरण काय?

या योजनेअंतर्गत १०,००० महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित कंपनीने (Kinetic Green) निकृष्ट दर्जाची वाहने देऊन महिलांची फसवणूक केली आहे. 3.98, लाख रुपये किंमत असूनही या रिक्षा साध्या चढावरून ही मागे येतात. एकदा चार्ज केल्यावर ११० किमी चालणे अपेक्षित असताना अवघ्या ७० ते ८० किमीमध्ये बॅटरी संपते. अनेक रिक्षांना तर अद्याप RTO पासिंगही मिळालेले नाही. हा थेट ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असून याची CBI किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे.

Women beneficiaries protest against alleged substandard e-rickshaws under the Pink Rickshaw Scheme in Maharashtra.
Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

या रिक्षांमुळे आमच्या आयुष्य उध्वस्त झाले.

स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून भंगार गाड्या आमच्या गळ्यात मारल्या, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. सरकारने पुढील १५ दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन तांत्रिक ऑडिट करावे आणि आम्हाला रिचार्ज चेंज करून ठेवा, L5, ऑटो रिक्षा मिळाव्यात आणि दोषींवर कारवाई करावी. योजनेतील तांत्रिक व टेंडर घोटाळ्याचे प्रमुख मुद्दे (Technical Highlights): शासकीय निविदा (RFP No: CWCD/WD/01/2024) आणि प्रत्यक्ष पुरवलेली वाहने यात खालील गंभीर तफावत आढळली आहे.

Women beneficiaries protest against alleged substandard e-rickshaws under the Pink Rickshaw Scheme in Maharashtra.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

आर्थिक तफावत: बाजारात उपलब्ध असलेल्या दर्जेदार ई-रिक्षेंच्या तुलनेत या रिक्षेची किंमत बाजार भाव मूल्य दोन लाखापेक्षा अधिक कमी असताना, प्रत्यक्ष मात्र (₹३,९८,००३) जवळपास दुप्पट आकारून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आली.

बॅटरी व रेंज: टेंडरनुसार १०० Ah क्षमतेची बॅटरी अनिवार्य आहे, मात्र प्रत्यक्षात कमी क्षमतेची बॅटरी दिल्याने अपेक्षित ११० किमी ऐवजी केवळ ७० ते ८० किमीच रेंज मिळत आहे.

सुरक्षा मानके (AIS-156): ई-रिक्षेसाठी अनिवार्य असलेली बॅटरी सुरक्षा मानके पूर्ण केलेली नाहीत, ज्यामुळे उन्हाळ्यात बॅटरीला आग लागण्याचा धोका वाढला आहे.

चढणीची क्षमता (Gradeability): नियमानुसार ७ डिग्री चढण चढणे आवश्यक आहे, परंतु या रिक्षे पुलावर अर्ध्यावरच बंद पडतात, जो प्रवाशांच्या व महिलांच्या जीवाशी खेळ आहे.

बॉडी व मजबुती: ३५० किलो म्हणजेच L5 कॅटेगरी वजनाचे निकष असताना गाड्या अत्यंत हलक्या "L3,पत्र्याच्या आहेत, ज्याचा अपघात झाल्यास मोठा धोका संभवतो. ई रिक्षाचे सतत अपघात होत आहे ,अनेक महिला रिक्षा पलटी होऊन अपघातामध्ये जखमी झाल्या आहेत,

कायदेशीर अडथळे: ARAI/ICAT प्रमाणपत्राच्या अभावामुळे शेकडो रिक्षेंची RTO नोंदणी रखडली असून महिलांना रस्त्यावर दंड भरावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com