

Samsung Galaxy M17e 5G भारतात लॉन्च.
5G सपोर्ट आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले.
या फोनमध्ये सहा वर्षांपर्यंत अपडेट्स मिळतील
सॅमसंगने भारतात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन, गॅलेक्सी M17e 5G, लॉन्च केला आहे. कंपनीची एम-सिरीज भारतात बऱ्याच काळापासून मध्यम वर्गातील ग्राहकांना लक्षात घेत हा नवीन फोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 5G प्रोसेसर आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, हा फोन २० मार्चपासून सॅमसंगच्या वेबसाइटवर, ॲमेझॉनवर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
कंपनीने गॅलेक्सी M17e 5G दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹13,999 आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹15,499 आहे. हा फोन व्हायब व्हायोलेट आणि ब्लिट्झ ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
Samsung Galaxy M17e 5G मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. यात 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे, ज्यामुळे स्क्रीनवर स्क्रोलिंग आणि ॲप्स वापरण्याचा अनुभव अधिक सुरळीत आणि सोपा होईल, असा कंपनीने दावा केला आहे. मागील एम-सिरीज फोनप्रमाणेच या फोनचे डिझाइनही साधे ठेवण्यात आले आहे. याची जाडी अंदाजे ८.२ मिमी आहे. मागील पॅनलसाठी ग्लास फायबर रीइन्फोर्स्ड पॉलिमर (GFRP) मटेरियलचा वापर केला आहे, ज्यामुळे फोन वजनाने हलका आणि मजबूत बनतो.
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G सह येणार आहे. हा चिपसेट एंट्री-लेव्हल आणि मिड-रेंज 5G फोनमध्ये वापरला जातो. ग्राफिक्ससाठी, यात ARM Mali-G57 GPU वापरण्यात आला आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि मल्टीटास्किंग यांसारख्या दैनंदिन कामांसाठी हे हार्डवेअर शानदार काम करते.
फोटोग्राफीसाठी, गॅलेक्सी M17e 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक डेप्थ कॅमेरा देखील आहे, जो पोर्ट्रेट फोटोंमध्ये बॅकग्राउंड ब्लर इफेक्ट देण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात चांगले फोटो काढण्यास सक्षम असल्याचा कंपनी करते.
गॅलेक्सी एम सिरीज मोठ्या बॅटरीसाठी ओळखली जाते आणि कंपनीने या फोनमध्येही 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीच्या मते, ही बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी बनवली आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ती आरामात पूर्ण दिवस टिकू शकते. One UI 8 सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोनमधील बॅटरी व्यवस्थापन ऑप्टिमाइझ करण्यात आले आहे.
Samsung Galaxy M17e 5G मध्ये Android 16 बेस्ड One UI 8.0 देण्यात आले आहे. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित काही फीचर्स देण्यात आली आहेत. फोनमध्ये Google Gemini AI आणि Circle to Search फीचर्स देण्यात आली आहेत. ज्याच्या मदतीने युझर्स स्क्रीनवर असलेली कंटेंटचा शोध लगेच घेऊ शकतात. यासह एआयचा उपयोग करू शकतात. सुरक्षेसाठी फोनमध्ये सॅमसंग नॉक्स वॉल्ट आणि ऑटो ब्लॉकर सारखी फिचर्स समाविष्ट आहेत. ही फिचर्स युझर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.