WhatsApp Update: WhatsAppमध्ये मोठा बदल, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी आले खास फिचर, वाचा संपूर्ण माहिती

WhatsApp Noise Cancellation: व्हॉट्सअ‍ॅपने नॉईज कॅन्सलेशन फीचर आणून कॉलिंग अनुभव अधिक सुधारला आहे. पार्श्वभूमीतील आवाज कमी होणार असून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल अधिक स्पष्ट ऐकू येणार आहेत.
No More Background Noise WhatsApp Adds Smart Call Enhancement
WhatsApp UpdateGoogle
Published On

WhatsApp हे दैनंदिन वापरातलं महत्वाचं अ‍ॅप आहे. त्यामध्ये अनेकांची महत्वाची कागदपत्रे, मेसेजेस, फोटोज आणि बऱ्याच गोष्टी असतात. आता यामध्ये खूप चांगले आणि युजर्सना हवे असणारे बदल होत आहेत. त्यातीलच एक बदल आणि ग्राहकांना हवं असणार फिचर आलं आहे. ज्याची वाट ग्राहक बऱ्याच दिवसांपासून करत होते. पुढील लेखात आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

WhatsAppमध्ये आता व्हॉइस कॅन्सलेशनची भर पडली आहे. त्यामुळे तुम्हाला फोनवर बोलताना येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. बऱ्याचदा यावर आपण कॉल करून बोलतो, काही मंडळी बऱ्याच महत्वाच्या मिटींग WhatsAppवरच करत असतात. त्यामध्ये त्यांना इतर आवाज येतात. बाहेरचा आवाज येतो. पण आता त्याची चिंता मिटलीये. Wabetainfo नुसार, हे फीचर सध्या बीटा वर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे.

No More Background Noise WhatsApp Adds Smart Call Enhancement
Dhule Tourism: मार्चमध्ये पिकनिक प्लान करताय? धुळ्याजवळच्या Top 6 ठिकाणांचा नजारा या विकेंडला नक्की पाहा

तुम्हाला या नव्या फिचरमध्ये कॉलिंगचा अनुभव सुधारण्याचे व्हॉट्सॲपचे उद्दिष्ट आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन्ससोबतच , हे फीचर व्हॉट्सॲप वेबवरही उपलब्ध होईल. कंपनीने गेल्या महिन्यात व्हॉट्सॲप वेबसाठी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू केली होती. व्हॉट्सॲपचं हे फीचर फक्त व्हॉट्सॲप वेबपुरते मर्यादित नाही, तर ते अँड्रॉइड ॲपवरही वापरता येणार आहे. प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सॲप बीटा अँड्रॉइड २.२६.११.८ अपडेटमध्ये बिल्ट-इन नॉईज कॅन्सलेशन नावाचं एक नवीन फीचर पाहायला मिळत आहे. या फिचरमध्ये नॉईज कॅन्सलेशन फीचर कसं दिसेल याचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत.

स्क्रीनशॉट्समध्ये असं दिलं आहे की, कॉल चालू असताना वापरकर्त्यांना नॉईज कॅन्सलेशन फीचर शोधण्यासाठी वर स्क्रोल करावं लागेल, जे चालू करण्यासाठी एक टॉगल चालू करावा लागेल. नॉईज कॅन्सलेशन अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही, पण ते आयओएस प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या उपकरणांवर उपलब्ध आहे. जेव्हा आयफोन, आयपॅड किंवा इतर उपकरणांवर व्हॉट्सॲप कॉल येतो, तेव्हा नॉईज कॅन्सलेशन फीचर आपोआप सुरू होतं.

नॉईज कॅन्सलेशन म्हणजे काय?

अनेक ट्रू वायरलेस स्टिरिओ आणि स्मार्टफोन्समध्ये असणारं नॉईज कॅन्सलेशन हे वैशिष्ट्य, आजूबाजूच्या गर्दीचा आवाज, वाऱ्याचा आवाज आणि गर्दीचा आवाज वेगळा करून काम करतं, जेणेकरून तुमचा आवाज कॉलच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल. व्हॉट्सॲपच्या व्हॉइस कॅन्सलेशन फीचरचा उपयोग आणि युजर्सचे मत येत्या काही दिवसांतच कळेल. सध्या, हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असून निवडक व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत ते स्टेबल व्हर्जनमध्ये आणलं जाणार आहे.

No More Background Noise WhatsApp Adds Smart Call Enhancement
Low Blood Pressure: उभं राहताना किंवा उठताना अचानक चक्कर येते? BPच्या रुग्णांनी वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com