खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर, App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट
प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये WhatsApp हे अत्यंत महत्वाचे App असते. यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी किंवा पुरावे आपण सेव्ह करुन किंवा जवळच्या व्यक्तीला पाठवून ठेवला जातो. आता यामध्ये फक्त व्हिडीओ कॉल नाहीत तर इतर अनेक फिचर्स आले आहेत. त्यामध्ये फोटो स्टेटस, चॅटींगमध्ये विविधता, विविध इमोजीस आणि इतर फिचर्स आले आहेत. WhatsApp ने आता त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
WhatsApp मुळात चॅटींगसाठी वापरले जाते. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अॅपमध्ये अनेक अपडेट्स पाहायला मिळाले होते. आता ‘Guest Chats’ नावाचा आणखी एक भन्नाट फीचर आला आहे. या फीचरमुळे आता ज्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपच नाही, त्याच्याशीही तुम्हाला एक सोप्या पद्धत संवाद साधता येणार आहे. म्हणजेच, व्हॉट्सअॅप अकाउंट नसतानाही चॅटिंग करणे शक्य होणार आहे.
WhatsApp या फीचरबाबतची माहिती सर्वप्रथम WABetaInfo ने दिली आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर काही Android आणि iOS बीटा युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलं आहे. या फीचरमध्ये युजर्सना Guest Chat च्या माध्यमातून कोणालाही चॅटसाठी इन्वाइट करण्याची सुविधा मिळणार आहे. Guest Chats फीचरमध्ये युजर एक खास इन्वाइट लिंक तयार करू शकतो. ही लिंक अॅपमधील ‘Invite a friend’ सेक्शनमधून जनरेट केली जाते. त्यानंतर ही लिंक SMS, ईमेल किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करता येते. ज्या व्यक्तीकडे व्हॉट्सअॅप नाही, ती व्यक्तीही या लिंकच्या मदतीने थेट संभाषणात सहभागी होऊ शकते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ही इन्वाइट लिंक मिळते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या मोबाईल किंवा संगणकावरील ब्राउजरमध्ये उघडू शकतो. लिंक ओपन केल्यानंतर त्याला व्हॉट्सअॅप डाउनलोड करण्याचा किंवा ‘गेस्ट’ म्हणून चॅट सुरू ठेवण्याचा पर्याय दिला जातो. जर गेस्ट पर्याय निवडला, तर संभाषण थेट WhatsApp Web च्या माध्यमातून ब्राउजरमध्ये सुरू होते. अशा पद्धतीने तुम्ही हे App वापरु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

