Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक जण विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. धुळे परिसरात कमी अंतरात निसर्ग, इतिहास आणि शांततेचा अनुभव देणारी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
कुटुंब किंवा मित्रांसोबत पिकनिकसाठी ही ठिकाणं उत्तम पर्याय ठरू शकतात. पुढे तुम्हाला याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
लळिंग किल्ला हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. येथून धुळे शहराचा नजारा अतिशय सुंदर दिसतो. धुळे शहरापासून फक्त 10 किमी अंतरावर असून खासगी वाहनाने सहज पोहोचता येते. सूर्योदय-सूर्यास्तासाठी हे ठिकाण खास आकर्षण ठरते.
अनेर नदीवर बांधलेलं हे धरण शांत आणि रम्य वातावरणासाठी ओळखलं जातं. कुटुंबासोबत रिलॅक्स पिकनिकसाठी हे उत्तम आहे. धुळ्यापासून सुमारे 35 किमी अंतरावर असून हिरवाई आणि पाण्याचा नजारा फोटोसाठी खास आकर्षण ठरतो.
तोरणमाळ हे थंड हवेचे सुंदर हिल स्टेशन असून डोंगर आणि तलावांनी वेढलेले आहे. धुळ्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असून यशवंत तलाव, सनसेट पॉइंट आणि सीता खाई ही प्रमुख आकर्षणं आहेत.
नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेले हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. धुळ्यापासून 60 किमी अंतरावर असून येथे गरम पाण्यात स्नान करण्याचा वेगळाच अनुभव मिळतो.
तापी नदीकाठी वसलेलं हे ठिकाण ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. धार्मिक वातावरण आणि शांतता यामुळे पर्यटक आकर्षित होतात. धुळ्यापासून सुमारे 70 किमी अंतरावर असून येथे मंदिरे आणि नदीकिनारा खास आकर्षण आहे.
गौताळा अभयारण्य हे अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानलं जातं. येथे विविध पक्षी आणि वन्यजीव पाहायला मिळतात. धुळ्यापासून 80 किमी अंतरावर असून जंगल सफारी आणि धबधबे हे मुख्य आकर्षण आहेत.