Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Palghar Accident: पाालघरमध्ये भरधाव ट्रकने १५ वर्षीय मुलीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक संतप्त झाले.
Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
Palghar Accidentsaam Tv
Published On
  • पालघरच्या वानगाव येथे ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

  • मामाच्या गावाकडे जात असताना अपघात झाला.

  • भरधाव ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला

  • पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये भीषण अपघातामध्ये १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मामाच्या गावाकडे जात असताना या मुलीला भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून या मुलीचा जागीच मृत्यू झाला. पालघरच्या वानगाव येथे ही अपघाताची घटना घडली. वानगावच्या रेल्वे यार्ड परिसरात माती वाहतूक करणाऱ्या ट्रकने या मुलीला चिरडलं. या अपघातात प्राप्ती प्रवीण जाधव या मुलीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पालघर जिल्ह्यातील वानगाव येथे शुक्रवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. प्राप्ती जाधव मामाच्या घरी जाण्यासाठी कुटुंबासोबत निघाली होती. वाटेत भरधाव ट्रकच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. वानगाव रेल्वे यार्ड परिसरात माती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसून ती ट्रकच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की प्राप्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले.

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, प्राथमिक तपासात अपघातग्रस्त ट्रकची आवश्यक कागदपत्रे नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहनाच्या वैधतेबाबत आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यात आले होते का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी ट्रक चालकाची चौकशी सुरू केली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वानगाव परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अवैध वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Accident: मामाच्या गावाकडे जाताना काळाचा घाला, ट्रकच्या चाकाखाली चिरडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
Accident Tragedy : ताम्हिणी घाटात थरार! अंधारात टॉयलेटला गेले, दरीचा अंदाज न आल्याने खोल दरीत कोसळले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com