Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये भरधाव डंपरने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर हा डंपर रिक्षावर उलटला. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
Uttar Pradesh Accident Saam Tv
Published On
  • उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू

  • बांदा येथे डंपरने रिक्षाला धडक दिली

  • ई-रिक्षावर डंपर उलटल्याने भीषण दुर्घटना

  • या अपघातामध्ये ४ जण जखमी झालेत

उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव डंपरने अनेकांना चिरडलं. या अपघातामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांधा येथे ही घटना घडली. या अपघातानंतर घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको केला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बिसांडा शहरातील कालव्याजवळ खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव डंपरने सायकलवरून जाणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकाला धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी त्या डंपरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने डंपरचा वेग वाढवला आणि समोरून येणाऱ्या ई-रिक्षाला जोरदार धडक दिली आणि ई- रिक्षावर उलटला.

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
Accident: मंत्र्यांच्या कारला महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा चुराडा; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

या ई-रिक्षातून प्रवास करणारे ९ जण गंभीर जखमी झाले. यामधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. ही घटना बिसंडा कस्बेमध्ये घडली. अपघातामध्ये जखमी झालेल्या ५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणायत आले आहे. या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रास्तोरोको आंदोलन करत डंपर चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा

पोलिसांनी सांगितले की, बिसांडा येथील घुरी गावातील ६१ वर्षीय निवृत्त शिक्षक रामेश्वर हे बीआरसीमधून आपल्या सायकलने घरी जात होते. लाउली टिकामू रस्त्यावरील कालव्याजवळ खुरहंदकडून येणाऱ्या खडीने भरलेल्या भरधाव डंपरने त्यांना चिरडले. अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालकाने डंपरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकऱ्यांनी बाईकवरून त्याचा पाठलाग सुरू केला. चालकाने वेग वाढवला आणि ५०० मीटर पुढे जाऊन समोरून येणाऱ्या एका ई-रिक्षाला धडक दिली आणि त्यावर उलटला.

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

या अपघातामध्ये ई-रिक्षातून प्रवास करत असलेले कोर्राही गावातील रहिवासी ई-रिक्षा चालक नवीन, त्याचा शेजारी शाहबाज, राकेश आणि सोहनलाल यांचा मृत्यू झाला. शहबाजची आई शबाना, त्याची ३ महिन्यांची बहीण सफिया, सोहनलालची मुलगी शिवकली आणि बायको बउरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सीएचसी अटारा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू
Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण, जेलवारी करूनही अग्रवाल कुटुंबीयांचा माज उतरला नाही; धक्कादायक VIDEO चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com