Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा

Pune Car Accident: पुण्यामध्ये कारला भीषण अपघात झाला. भरधाव कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा
Pune AccidentSaam Tv
Published On
  • पुण्यात भरधाव कार पुलावरून कोसळली

  • दारूच्या नशेत तरुणाने भरधाव कार चालवली

  • गरवारे पुलावरून कार खाली कोसळली

  • अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये भयंकर रस्ते अपघाताची घटना घडली. दारूच्या नशेत तरुणाने कार चालवली. ही भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला. तर कारमधील इतर कुणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. या अपघाताप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार पाहायला मिळाला. १९ वर्षीय तरुणाने बेदरकारपणे कार चालवली. वेगात असल्याने कार गरवारे पुलावरून खाली कोसळली. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने पुलावरील रेलिंग तोडले. या अपघातामध्ये कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व अमित जैन (१९ वर्षे) असे कारचालक तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा
Accident News : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ३० प्रवाशांना घेऊन जाणारी डबल डेकर उलटली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, ही घटना २५ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली. संबंधित आरोपी तरुण हा जंगली महाराज रस्त्याचे डेक्कन जिमखाना येथे जात होता. रात्रीची वेळ असल्याने जंगली महाराज रस्त्याने जाताना आरोपी कार बेदरकारपणे चालवत होता. डेक्कन जिमखानाजवळ असलेल्या गरवारे पुलावरून गुडलक चौकाकडे जात असताना कारला अपघात झाला. चालक दारूच्या नशेत असल्याने वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्याने त्याचे वाहन या पुलावर असलेल्या रेलिंगवर धडकवले.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

कारचा वेग जास्त असल्याने कार पुलावरील रेलिंग तोडून पलीकडच्या बाजूला जाऊन कोसळली. अपघात होताच रात्रीची वेळ जरी असली तरी रहदारीचा भाग असल्यामुळे स्थानिकांची आणि इतर वाहन चालकांची सुद्धा मोठी गर्दी झाली. सुदैवाने या घटनेत चालक वगळता कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी कारचालकाला रुग्णालयात दाखल केले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, वाहनाचा चुराडा
Washim Accident: क्षणात सर्वकाही संपलं! भरधाव पिकअपने दुचाकीला चिरडलं, आईच्या डोळ्यासमोर २ मुली अन् नवऱ्याने सोडले प्राण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com