Pune : पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमध्ये आढळलं चक्क पाणी, वितरकाच्या चोरीनं नागरिक संतापले

Pune LPG Gas Cylinder Scam News : पुण्यात गॅस सिलेंडरमधून ३ ते ४ लिटर पाणी बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस एजन्सीवर फसवणुकीचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
PUNE LPG CYLINDER SCAM: WATER FOUND INSIDE BHARAT GAS CYLINDERS IN PARVATI AREA
PUNE LPG CYLINDER SCAM: WATER FOUND INSIDE BHARAT GAS CYLINDERS IN PARVATI AREASaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात गॅस सिलेंडरमधून पाणी बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

  • नागरिकांनी गॅस एजन्सीवर फसवणूक आणि निष्काळजीपणाचे आरोप केले

  • सिलेंडरमध्ये ३ ते ४ लिटर पाणी आढळल्याने कमी गॅस मिळत असल्याचा संशय व्यक्त केला

  • अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कठोर कारवाईची मागणी

सागर आव्हाड, पुणे

Water Found In Gas Cylinder Fraud Pune Agency पुण्यातील पर्वती परिसरातील ‘जय भवानी जनता वसाहत’ येथे घरगुती गॅस सिलेंडरबाबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील अनेक नागरिकांनी गॅसच्या सिलेंडरमधून गॅसऐवजी तब्बल ३ ते ४ लिटर पाणी बाहेर आल्याची तक्रार केली आहे. आधीच मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची दखल स्थानिक समाजसेविका नाज इनामदार यांनी घेतली असून त्यांनी संबंधित गॅस एजन्सीविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या मते, हा प्रकार एखाद्या एकट्या ग्राहकासोबत घडलेला नसून अशा अनेक तक्रारी एजन्सीकडे पूर्वीपासून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून फसवणुकीचा भाग आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सिलेंडर (LPG Cylinder News )वापरताना गॅस कमी मिळत असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून होती. मात्र, सिलेंडर रिकामे झाल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. याबाबत विचारणा केली असता संबंधित गॅस एजन्सीने (Gas Cylinder Agency Fraud) सिलेंडरमध्ये पाणी असल्याचे मान्य केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, “अशा प्रकारची टाकी कधीकधी ग्राहकांकडे जाते आणि सिलेंडरमध्ये पाणी कंपनीकडूनच येते,” असे स्पष्टीकरण एजन्सीकडून देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, काही नागरिकांनी सिलेंडर री-फिलिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे.

PUNE LPG CYLINDER SCAM: WATER FOUND INSIDE BHARAT GAS CYLINDERS IN PARVATI AREA
NEET Paper Update : NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट! २ शिक्षकांना अटक, आरोपी प्रोफेसरचा नंबर 'गॉड' नावाने सेव्ह

गॅसची चोरी करून सिलेंडरचे वजन कायम ठेवण्यासाठी त्यात पाणी भरले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ३ ते ४ लिटर पाणी भरल्यामुळे ग्राहकांना कमी गॅस मिळतो आणि आर्थिक फसवणूक होते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, सिलेंडरची ‘हायड्रो टेस्टिंग’ करताना पाण्याचा वापर केला जातो. मात्र, चाचणीनंतर सिलेंडर योग्य प्रकारे कोरडे न केल्यास थोडेफार पाणी राहू शकते. परंतु, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आढळणे हे फसवणुकीचे लक्षण मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची अन्न व नागरी पुरवठा विभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com