NEET Paper Update : NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट! २ शिक्षकांना अटक, आरोपी प्रोफेसरचा नंबर 'गॉड' नावाने सेव्ह

NEET Exam 2026 Case Update News : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला असून अल्पवयीन मुलाने सीबीआयसमोर कबुली दिली आहे. या प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली असून एकूण आरोपींची संख्या १२ झाली आहे.
NEET PAPER LEAK 2026: MINOR CONFESSION, PROFESSOR ARRESTED, TOTAL ACCUSED REACH 13
NEET PAPER LEAK 2026: MINOR CONFESSION, PROFESSOR ARRESTED, TOTAL ACCUSED REACH 13Saam Tv
Published On
Summary
  • क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने सीबीआयसमोर महत्त्वाची कबुली दिली

  • १० दिवस आधी प्रश्नपत्रिका मिळाल्याचा खुलासा

  • आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या १३ वर

  • नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण

  • तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता

अक्षय बडवे, पुणे

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात एका क्लास संचालकाच्या अल्पवयीन मुलाने केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) समोर कबुली दिल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आली असून आकडा १३ वर गेला आहे. दरम्यान आता कोणते मोठे मासे गळाला लागणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेलं.

सीबीआयच्या पुण्यातील चौकशीत लातूर येथील एका क्लास संचालकाच्या मुलाने सांगितले की, त्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप १० दिवस आधीच मिळाले होते. हा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला करता साक्षीदार बनवले जाऊ शकते. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करत सीबीआयने मनीषा हवालदार यांच्याकडून फिजिक्स पेपरचे प्रश्न मिळवणाऱ्या प्रोफेसरला अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अटकेनंतर या प्रकरणातील एकूण अटक संख्या १३ वर पोचली आहे.

NEET PAPER LEAK 2026: MINOR CONFESSION, PROFESSOR ARRESTED, TOTAL ACCUSED REACH 13
Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद

मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी तेजस हर्षदकुमार शाह हे पुण्यातील 'डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी' (APMA) येथे फिजिक्सचे शिक्षक आहेत. त्यांनी अटकेत असलेली आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून NEET-UG २०२६ परीक्षेचे लीक झालेले फिजिक्स पेपरचे प्रश्न मिळवल्याचा आरोप आहे. तसेच सीबीआयने लातूर येथील डॉक्टर मनोज शिरुरे यांना सुद्धा अटक केली आहे. त्यांनी या पेपर फुटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. डॉ. शिरुरे यांनी आरोपी कोचिंग सेंटर मालकाच्या मुलासह इतर तीन विद्यार्थ्यांना आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून केमिस्ट्रीचे लीक झालेले प्रश्न मिळवून देण्यासाठी मध्यस्थी केली होती.

NEET PAPER LEAK 2026: MINOR CONFESSION, PROFESSOR ARRESTED, TOTAL ACCUSED REACH 13
PM Internship Scheme 2026 : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी! दरमहा मिळतील ९००० रुपये, कसे? जाणून घ्या

या प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारने तेजस शाहचा मोबाईल नंबर ‘गॉड’ या नावाने सेव्ह केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी तेजस शहा याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सर्व घडामोडींमुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सीबीआयचा तपास पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com