PM Internship Scheme 2026 : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी! दरमहा मिळतील ९००० रुपये, कसे? जाणून घ्या

Government PM Internship Scheme 2026 : पंतप्रधान इंटर्नशिप योजना २०२६ अंतर्गत तरुणांना दरमहा ९००० रुपये स्टायपेंडसह इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन लवकर अर्ज करावा.
PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31
PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31AI
Published On
Summary
  • पंतप्रधान इंटर्नशिप योजना २०२६ चा तिसरा टप्पा सुरू

  • एकूण 31,480 पेक्षा जास्त इंटर्नशिपच्या जागा उपलब्ध

  • दरमहा ₹9,000 स्टायपेंड आणि प्रमाणपत्र मिळणार

  • अर्जाची अंतिम तारीख ३१ मे २०२९

देशातील तरुणांना करिअरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) सुरू केली असून, या योजनेला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे तरुणांना इंटर्नशिप करता येणार असून त्याबदल्यात मोबदला म्हणून दरमहा ९००० रुपये दिले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी फॉर्म भरण्याची ३१ मे २०२६ शेवटची तारीख आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता तरुणांनी हा फॉर्म लवकरात लवकर भरणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून देशभरातील तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या टप्प्यात एकूण ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना नामांकित आणि आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31
School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

योजनेसाठी कोण पात्र आणि अपात्र?

या योजनेअंतर्गत १८ ते २५ वयोगटातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार पात्र राहतील. मात्र, सध्या पूर्णवेळ नोकरी करणारे किंवा पूर्णवेळ शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेसाठी अपात्र ठरतील. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने इतका ठेवण्यात आला असून या काळात निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९,००० रुपये वेतन दिले जाणार आहे. तसेच, इंटर्नशिप यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाईल, जे भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी उपयुक्त ठरेल.

PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31
School Reopen : १५ जून पासून शाळेची घंटा वाजणार! पुणे जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर

नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी

पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लि. (२४० जागा), बजाज ऑटो लि. (३०९ जागा), व्होक्सवॅगन इंडिया प्रा. लि. (३ जागा), रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (३३ जागा), टेक महिंद्रा (२ जागा), बर्जर पेंट्स इंडिया लि. (८ जागा), बीव्हीजी इंडिया लि. (२ जागा), एमक्युअर फार्मास्युटिकल्स लि. (२५ जागा), इमामी लि. (१५ जागा) आणि फिनोलेक्स केबल्स लि. (५० जागा) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे

PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31
CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

काय आहे फायदा?

प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा रेझ्युमे अधिक प्रभावी बनतो. परिणामी, भविष्यात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता अधिक वाढते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, उमेदवार घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने अर्ज करू शकतात.

PM INTERNSHIP SCHEME 2026: APPLY ONLINE FOR ₹9000 STIPEND, LAST DATE MAY 31
Shocking : भयंकर! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरने साधली संधी; धाकट्या बहिणीवर अत्याचार करून काढला पळ

कसा कराल अर्ज?

यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे खाते तयार केल्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते. त्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. उमेदवारांना त्यांच्या आवडीप्रमाणे क्षेत्र किंवा कंपनी निवडण्याची संधीही दिली जाते. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. अर्ज यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा ईमेलद्वारे मेसेज येतो. निवड प्रक्रियेबाबतची पुढील माहितीही त्याच माध्यमातून कळवली जाते. एकूणच, ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ ही तरुणांसाठी करिअरची मजबूत पायाभरणी करण्याची सुवर्णसंधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com