Shocking : भयंकर! बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरने साधली संधी; धाकट्या बहिणीवर अत्याचार करून काढला पळ

Rajasthan Crime News : राजस्थानातील सीकर जिल्ह्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
SHOCKING MINOR ASSAULT CASE IN SIKAR RAJASTHAN ACCUSED ABSCONDING
SHOCKING MINOR ASSAULT CASE IN SIKAR RAJASTHAN ACCUSED ABSCONDINGSaam Tv
Published On
Summary
  • सीकरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना

  • बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप

  • आईच्या तक्रारीमुळे प्रकरण उघडकीस

  • आरोपी फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोठ्या बहिणीच्या लिव्ह-इन पार्टनरने तिच्या अवघ्या १४ वर्षांच्या धाकट्या बहिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची मोठी बहीण काही वर्षांपूर्वी घर सोडून एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, याच तरुणाने संधी साधून घरात ये-जा करत मुलीला विश्वासात घेऊन तिला फसवलं आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना घडल्यानंतर मुलगी अत्यंत घाबरली होती. काही काळ तिने हा प्रकार लपवून ठेवला, मात्र नंतर तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

SHOCKING MINOR ASSAULT CASE IN SIKAR RAJASTHAN ACCUSED ABSCONDING
School Reopen : १५ नाही तर २६ जून, शाळा सुरू होण्याची तारीख का बदलली जाणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मोठ्या मुलीशी संपर्क साधून तिला याबाबत सांगितले. मात्र, आरोपानुसार मोठ्या मुलीने आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरने कुटुंबावर दबाव टाकत ही बाब बाहेर येऊ नये, यासाठी धमक्या दिल्या. तरीही, पीडितेच्या आईने कोणत्याही दबावाला न जुमानता पुढे येत पोलिसांची मदत घेतली. तिच्या या निर्णयामुळे प्रकरण उघडकीस आले.

SHOCKING MINOR ASSAULT CASE IN SIKAR RAJASTHAN ACCUSED ABSCONDING
School Reopen : १५ जून पासून शाळेची घंटा वाजणार! पुणे जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अल्पवयीन पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून तिचा जबाब नोंदवला आहे. तसेच, पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी तरुण सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com