Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद

Mahanagar Gas Limited Stopped PNG And CNG Subsidies : मध्यपूर्वेतील तणावामुळे MGL ने PNG आणि CNG सबसिडी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि उद्योगांवर होणार आहे.
Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद
Mahanagar Gas Limited Stopped PNG And CNG SubsidiesSaam Tv
Published On
Summary
  • मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम

  • MGL ने PNG आणि CNG सबसिडी बंद केली

  • इंधन दरवाढीमुळे महागाईत वाढ

  • उद्योग आणि सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढणार

Mahanagar Gas Limited Stopped PNG And CNG Subsidies मध्यपूर्वेत सुरु असलेल्या तणावाचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे होर्मुज सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाले असून, त्याचा फटका कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर बसला आहे. त्यामुळे इंधनटंचाई आणि वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता महानगर गॅस लिमिटेडने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सबसिडी आणि इतर योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना आणखी एक झटका मिळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासूनच देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण पडला आहे. त्यातच मागील १२ दिवसांत इंधनाच्या दरात झालेली झपाट्याने वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने महागाईतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेड Mahanagar Gas Limited (MGL) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने व्यावसायिक पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) ग्राहकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सबसिडी (MGL Subsidy) आणि आर्थिक सहाय्य योजना तात्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद
School Reopen : १५ जून पासून शाळेची घंटा वाजणार! पुणे जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर

MGL ने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या जागतिक परिस्थितीत इंधन पुरवठा आणि किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलती सुरू ठेवणे कंपनीसाठी शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा सुरळीत सुरू राहील आणि ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्याची हमीही कंपनीने दिली आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल्स, वाहतूक क्षेत्र, तसेच विविध उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. कारण हे सर्व क्षेत्र मोठ्या प्रमाणात पीएनजी आणि सीएनजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च वाढून त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे. एकूणच, जागतिक घडामोडींचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे. आगामी काळात इंधन दर आणि पुरवठ्याबाबत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com