

जळगावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
शिक्षकाच्या कृत्याने पालकवर्गात संताप
पीडितेसह पालकांनी शिक्षकाला चोपला
संजय महाजन,साम टीव्ही
जळगावमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगावच्या धरणगावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाच्या कृत्याने संपूर्ण पालकवर्गात संतापाची लाट उसळली. काही संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला भर चौकात चोपला. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. जळगावच्या धरणगावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
जळगावच्या धरणगावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारानंतर शिक्षकाला पीडित विद्यार्थिनीसह तिचे कुटुंबीय काठीने चोप दिला. शिक्षकाला चोप देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षक हा विद्यार्थिनीकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी करत होता. शिक्षकाच्या फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे विद्यार्थिनी नैराश्यात तसेच मानसिक तणावात गेली होती.
मानसिक तणावात गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची तक्रारीतून माहिती समोर आली आहे. शिक्षकाने थेट विद्यार्थिनीच्या घरी जाऊन देखील तिला त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आहे. शिक्षक विद्यार्थिनीच्या घरी आल्यावर हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. त्यानंतर शिक्षकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय मोडल्याची माहिती समोर आली आहे.
शाळा सोडून विद्यार्थिनी पुढच्या वर्गात म्हणजे महाविद्यालयात गेल्यावरही शिक्षक तिला त्रास देत होता, असेही तक्रारीतून समोर आले आहे. विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीतून सर्व माहिती समोर आली आहे. पोलिसांनी देखील या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.