ताम्हिणी घाटाजवळ टॉयलेटसाठी उतरलेल्या प्रवाशाचा दरीत पडून अपघात
प्रवासी चिपळूणहून पुण्याकडे आपल्या मुलासोबत प्रवास करत होते
पोलिस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने ४५ मिनिटांत त्यांना सुखरूप बाहेर काढले
बचाव पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
अमित गवळे,रायगड
कोकणातून पुण्याकडे प्रवास करत असताना ताम्हिणी घाटात टॉयलेटला गेलेल्या एका व्यक्तीचा अंधारामुळे अंदाज न आल्याने थेट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने पोलिस आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाने तातडीने धाव घेत अवघ्या ४५ मिनिटांत त्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.संदेश विश्राम हाडवळे (वय ४७) असे जखमी प्रवाशाचे नाव असून ते चिपळूणहून आपल्या मुलासोबत कारने पुण्याकडे निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ आल्यानंतर त्यांना टॉयलेटला झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रचंड अंधार होता. त्यात आजूबाजूला असलेल्या दरीची खोली देखील खूप होती. या दरीच्या खोलीचा आणि त्यांच्यामधील सुरक्षित अंतर यांचा अंदाज त्यांना आला नाही. याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते थेट दरीत कोसळले.
पहाटेची वेळ, घाटातील दाट अंधार आणि खोल दरी यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले होते. मात्र, रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी धाडसाने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. सुमारे ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर जखमी अवस्थेत पडलेल्या संदेश हाडवळे यांचा शोध घेण्यात यश आले. त्यांना सुरक्षितरित्या वर आणून तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच शरीराच्या इतर भागांवरही जखमा झाल्या आहेत. दरम्यान, रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.