Accident News : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची उभ्या कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Mumbai Western Expressway Accident News : मुंबईत बेस्ट बसने उभी असलेल्या कारला धडक दिल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
MALAD EAST BEST BUS ACCIDENT: 50-YEAR-OLD MAN KILLED AFTER BUS HITS PARKED CAR ON WESTERN EXPRESS HIGHWAY
MALAD EAST BEST BUS ACCIDENT: 50-YEAR-OLD MAN KILLED AFTER BUS HITS PARKED CAR ON WESTERN EXPRESS HIGHWAYAI
Published On
Summary
  • मालाड परिसरात बेस्ट बसची उभ्या कारला धडक

  • अपघातात ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  • पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

  • पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे

Mumbai Malad Western Expressway Accident News मुंबईतील मालाड पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुष्पा पार्क परिसरात बेस्ट बसने उभी असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस चालक ब्रह्म विष्णू पवार (वय ३३) चालवत होते. बस पुष्पा पार्क परिसरात पोचली असता तिची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक बसली. अपघाताच्या वेळी रामचंद्र निरहू पाल (वय ५०) हे आपल्या कारच्या मागच्या बाजूला उभे होते. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, कार पुढे ढकलली गेली आणि तिने समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यामुळे त्या वाहनाच्या मागील उजव्या बाजूच्या बंपर आणि बॉडीचे नुकसान झाले.

MALAD EAST BEST BUS ACCIDENT: 50-YEAR-OLD MAN KILLED AFTER BUS HITS PARKED CAR ON WESTERN EXPRESS HIGHWAY
Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

अपघातानंतर पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. या अपघातात रामचंद्र पाल गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी पाल यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

MALAD EAST BEST BUS ACCIDENT: 50-YEAR-OLD MAN KILLED AFTER BUS HITS PARKED CAR ON WESTERN EXPRESS HIGHWAY
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी अपघातात चक्काचूर झालेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. बस चालकाची चौकशी करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com