Nariman Point Cuffe Parade: नरिमन पॉईंट ते कफ परेडचा प्रवास होणार काही मिनिटांत; मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

Mumbai Traffic News : नरिमन पॉईंट ते कफ परेडदरम्यान १.८६९ किमी सागरी मार्ग उभारला जाणार आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे.
Coastal Road Extension to Ease Mantralaya Area Traffic Congestion
Coastal Road Extension to Ease Mantralaya Area Traffic Congestiongoogle
Published On

मुंबईतही वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. शासनाच्या योजनेप्रमाणे आता मुंबईकरांना लवकर सागरी मार्गाची सफर घडणार आहे. सध्या नरिमन पॅाईंट येथून कफ परेड, कुलाबा, नेव्हीनगर येथे जाण्यासाठी कॅप्टन प्रकाश पेठे, मादाम कामा रोड, वीर नरिमन रोड आणि महर्षी कर्वे रोड हे मार्ग आहेत.

शिवाय भविष्यात उभारले जाणारे अनेक प्रयत्न यांमुळे वाहतुक कोंडीमध्ये अधिक भर होऊन नागरिकांना होणारा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून उभारला जाणारा १.८७ किमी लांबीचा सागरी मार्ग हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी ठरणार आहे. या मार्गाची लांबी १.८६९ किमी असून रुंदी १६ मीटर असणार आहे. १.७६५ संपादित भूभाग या प्रकल्पासाठी लागणार असून यात महापालिका आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनींचा समावेश असणार आहे.

Coastal Road Extension to Ease Mantralaya Area Traffic Congestion
मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू; यादी कधी आणि कुठे पाहाल?

या पुलाचे काम दोन विभागांच्या रॅम्पसह होणार असून कोस्टल स्लिट ब्रीजवर केले जाणार आहे. पहिला रॅम्प ७०४ मी. लांब, दुसरा रॅम्प ४१८ मी. डबल डेकर लांब, तसेच ६१४ मी. लांब समुद्रवरील पूल तर त्यापुढे ५९९ मी. सिल्टवर उभारण्यात येणारा किनारी रस्ता असणार आहे.

किनार्यावरील झाडांचे स्थलांतर

उभारण्यात येणार्या सागरी महामार्गामुळे १३२ झाडांचे स्थलांतर केले जाणार आहे. त्यातील शक्य तितकी झाडे वाचवण्यात येणार असून ७९ झाडांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच समुद्रात ०.०७७ हेक्टर क्षेत्रावर भराव टाकला जाणार आहे.

Coastal Road Extension to Ease Mantralaya Area Traffic Congestion
PPF Interest Rate 2026: गुड न्यूज! PPF पासून ते सुकन्या समृद्धीपर्यंत..., सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर केला मोठा बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com