PPF Interest Rate 2026: गुड न्यूज! PPF पासून ते सुकन्या समृद्धीपर्यंत..., सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर केला मोठा बदल

Sukanya Samriddhi Scheme : केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीसाठी पीपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी आणि काही योजनांचे व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
PPF Interest Rate 2026
PPF Interest Rate 2026google
Published On

केंद्र सरकारने देशातल्या कोट्यवधि मध्यमवर्गीय कुटुंबे, नोकरदार आणि छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सुकन्या समृद्धी योजना किंवा इतर योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या आर्थिक वर्ष २०२६ ते २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी लघुबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलग नवव्या तिमाहीत सरकारने या योजनांवरचा व्याजदर स्थिर ठेवला आहे. यापूर्वी सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत काही निवडक लघुबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये बदल केला होता. त्यानंतर आत्तापर्यंत व्याजात कोणताही बदल केलेला नाही.

PPF Interest Rate 2026
Highway Toll Rules: वाहनचालकांसाठी खुशखबर! महामार्गावरील टोल नियमात मोठा बदल, काय आहे सरकारचा प्लॅन?

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुचनांनुसार, सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के ठेवण्यात आला आहे. मुलींच्या भविष्यासाठी ही योजना सर्वात जास्त लोकप्रिय मानली जाते आणि लघुबचत योजनांमध्ये याच योजनेवर सर्वात जास्त व्याज मिळतं.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) योजनेवरचा व्याजदर ७.१ टक्केच राहणार आहे. दीर्घकालीन बचत आणि करसवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक गुंतवणूकदार या योजनेती निवड करतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेवर ७.७ टक्के व्याज मिळणार असून मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के व्याज ठेवण्यात आलं आहे.

किसान विकास पत्र(KVP) योजनेवरचा व्याजदर ७.५ टक्के राहणार आहे. याशिवाय तीन वर्षांच्या टर्मडिपॉझिटवर ७.१ टक्के आणि पोस्ट ऑफिस बचत खात्यावर ४ टक्के व्याज असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना स्थिर आणि सुरक्षित परतावा मिळत राहणार आहे.

सूचना: ही माहिती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा.


PPF Interest Rate 2026
Maharashtra Rain Alert: राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट, मुंबई-पुण्यातील हवामानाचा अंदाज काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com