सरकार गरिबांना देणार ४६००० रुपये? अर्थमंत्रालय मदत देणार, सत्य नेमकं काय?

fact check : सरकार आता गरिबांना 46 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
viral news
Fact check Saam tv
Published On

केंद्र सरकार आता गरिबांना 46 हजारांची मदत करणार आहे असा दावा केल्याने सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय की हे पैसे मिळणार कसे...? गरिबांसाठी आर्थिक मदत म्हणून अर्थ मंत्रालय मदत देत असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय...कारण, सरकार हे गरिबांना पैसे देत असल्याने अनेकांना प्रश्न पडलाय की पैसे कसे मिळवायचे...? त्यामुळे आम्ही या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

viral news
नगरमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने रिक्षाला उडवले, ४ जणांचा जागीच मृत्यू

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय की, अर्थ मंत्रालय गरिबांना 46,715 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. आर्थिक संकटात अडकलेल्यांना सरकार मदत करणाराय'. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...यामेसेजसोबत लिंकही देण्यात आलीय...त्यामुळे याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला...खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का...? मेसेजसोबतच्या लिंकवर माहिती भरल्यावर पैसे मिळणार का...? याची माहिती घेतली...त्यावेळी आम्हाला PIB कडूनही माहिती मिळाली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

viral news
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; छत्रपती शिवरायांना गुजरातला पळवण्याचा डाव, VIDEO

अर्थ मंत्रालयाने कोणतीही योजना जाहीर केलेली नाही

सरकारच्या नावाने व्हायरल होत असलेला मेसेज खोटा

मेसेजसोबतच्या लिंकवर क्लिक करू नका

पैशांचं आमिष दाखवून फसवणुकीचा डाव

दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा

viral news
मुंबईत आणखी एका उमेदवारावर हल्ला; डोकं फुटलं, राजकीय वर्तुळात खळबळ

पैसे देण्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं जातं...त्यामुळे तुम्हाला असे मेसेज आले तर कोणत्याही लिंकवर जाऊन माहिती भरू नका...तुमची फसवणूक होऊ शकते...आमच्या पडताळणीत सरकार गरिबांना 46 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com