Highway Toll Rules: वाहनचालकांसाठी खुशखबर! महामार्गावरील टोल नियमात मोठा बदल, काय आहे सरकारचा प्लॅन?

New Toll Policy: केंद्र सरकारकडून महामार्गावरच्या टोन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता दोन टोल नाक्यांमध्ये ६० किमी अंतर आवश्यक राहील. त्यामुळे वाहनचालकांचा खर्च कमी होऊन प्रवास जास्त सोयीस्कर होणार आहे.
highway toll rule change
highway toll rule changeGOOGLE
Published On

तुम्ही वाहनचालक असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने टोल वसुलीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात वाहनचालकांचा प्रवास खर्च कमी होण्यास मदत होईल. सतत टोल आकारल्यामुळे नादरिकांकडून तक्रारींची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांनुसार, नवीन राष्ट्रीय महामार्ग किंवा एक्सप्रेसवेवर दोन टोल नाक्यांमध्ये अंदाजे ६० किलोमीटरचे अंतर ठेवणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांसाठी वाहनचालकांना पुन्हा-पुन्हा टोल भरावा लागणार नाही. यामुळे रोज महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पैशांचीही बचत होणार आहे.

highway toll rule change
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 'हा' एक फॉर्म्युला बदलला तर पगारात होऊ शकते बंपर वाढ; कॅल्क्युलेशन कसे असेल?

याआधी अनेक ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर अंतरावरच दुसरे टोल नाके उभारले जात होते. त्यामुळे वाहनचालकांना कमी अंतराच्या प्रवासातही खूप वेळा टोल भरावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांचा खर्च वाढत असल्याची तक्रार वारंवार केली जात होती. आता नवीन नियमामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

फास्टॅग वापरणाऱ्या वाहनचालकांनाही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. टोल नाक्यांची संख्या कमी झाल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच टोल प्लाझांवर लागणारा वेळ आता वाचणार आहे. त्यामुळे प्रवास जास्त वेगवान आणि होईल अशी शक्यता आहे.

तसेच सरकार भविष्यात जीपीएस आधारित टोल प्रणाली लागू करण्याच्या दिशेनेही काम करत आहे. ही प्रणाली सुरू झाल्यावर वाहनचालकांनी प्रत्यक्ष प्रवास केलेल्या अंतरानुसारच टोल भरावा लागेल. त्यामुळे टोल वसुली पद्धतीशीर होईल. महामार्गावरचा प्रवास जास्त सोयीस्कर, फास्ट आणि किफायतशीर करण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

highway toll rule change
PM Kisan Yojana : ... तर या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता, महत्त्वाची अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com