Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने

Mumbai Rain Local Train Updates: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका तिन्ही मार्गावरील लोकलसेवेला बसला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा अर्धा तास उशिराने सुरू आहे.
Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने
Mumbai Rain Local Train UpdatesSaam TV
Published On
  • मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल सेवेवर परिणाम

  • मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत

  • बदलापूर स्थानकाजवळ मालगाडीतील बिघाडामुळे वाहतूक खोळंबली

  • सर्व प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली

मुंबईमध्ये पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका लोकलसेवेला बसला आहे. मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या सत्रात बदलापूर-सीएसएमटी लोकल सेवेची रखडपट्टी झाली. मालगाडी थांबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर लोकल वाहतूक पूर्वपदावर आली आहे. तरी देखील लोकलसेवा उशिरा सुरू असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास सीएसएमटीकडे जाणारी मालगाडी बराच वेळ बदलापूर रेल्वे स्थानकात थांबल्यामुळे त्याचा फटका मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीला बसला. लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आजही मुंबईच्या दिशेने कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना ऑफिसमध्ये लटमार्क लागण्याची शक्यता आहे.

Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने
Mumbai local : मुंबई लोकल हत्याकांडातील धक्कादायक सत्य समोर; दारूच्या नशेत आरोपीने केला पोटात वार

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कर्जतहून सीएसएमटीकडे जाणारी मालगाडी बराच वेळ बदलापूर स्थानकात थांबून राहिल्यामुळे लोकल सेवेचा बोजवारा उडाला. तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी रखडल्याचं सांगण्यात येत आहे. १५ ते २० मिनिटानंतर ही मालगाडी सीएसएमटीकडे रवाना झाली. मात्र यामुळे मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. आताही लोकल वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे.

Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने
Mumbai Local : मुंबई लोकल हादरली! पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या

ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी तर सर्वच रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवेला देखील पावसाचा फटका बसला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ३० मिनिटं उशिराने सुरू आहे. या मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा देखील उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे.

Mumbai Local: मुंबईकरांचे हाल! पावसाचा फटका लोकलसेवेवर, मध्य - हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने
Mumbai Local Train : मुंबई लोकलचा नवा नियम! आता दारू पिऊन प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, थेट खिशाला बसणार कात्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com