मोठी बातमी! कैसे हराया फेम सहर शेखचे नगरसेवक पद जाणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Sehar Shaikh, caste certificate fraud : मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख हिचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा ठाणे तहसीलदारांचा अहवाल समोर आला आहे.
Sehar Shaikh Mumbra corporator
Sehar Shaikh Mumbra corporatorSaam TV
Published On

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

Sehar Shaikh Mumbra corporator controversy news today : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ⁠⁠ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता सहर शेख हिचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगरसेवक झाल्यानंतर केलेल्या भाषणावेळी सहर हिने कैसे हराया.. असे भाषणात म्हणाली अन् महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. सहरचे रील अन् व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता सहर शेख हिचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे. ( Mumbra Corporator Sehar Shaikh Faces Disqualification After Caste Certificate Declared Invalid in Thane Probe)

सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करण्यात यावा अशीे शिफारसही करण्यात आली आहे. ⁠तहसीलदार उमेश पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. ⁠उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जातपतडताळणी समितीकडे शिफारस केली.

Sehar Shaikh Mumbra corporator
Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

⁠सहरचे वडील यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची करण्यात तक्रार केली होती. सहर हिच्याविरोधात ⁠सिद्दीकी अहमद या व्यक्तीने तक्रार केली होती. त्यावर चौकशी करण्यात आली. त्यात सहर दोषी असल्याचे आढळले आहे.

Sehar Shaikh Mumbra corporator
Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी चौकशी केली. त्यानंतर अहवाल तयार केला. सहर शेख मुळची उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. ⁠जातपडताळणी विभाग, निवडणूक विभाग आणि ठाणे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय यांची फसवणूक केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सहर हिच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. त्याशिवाय तिचे नगरसेवकपदही जाऊ शकते.

Sehar Shaikh Mumbra corporator
Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com