Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

Nashik Shiv Sena leader attack update : नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) नेते सुयेश पाटील यांच्यावर ६-७ जणांनी कोयत्याने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Nashik Shiv Sena leader attack
Nashik Shiv Sena leader attackSaam TV Marathi
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik Crime Latest News Update : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनांनी डोकं वर काढलं आहे. शहरातील सिडको परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर ६ ते ७ जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुयेश पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. पाटील यांच्यावर हल्ला का केला? याचा तपास नाशिक पोलीस करत आहे.

नाशिकमधील सिडकोतील दत्त चौक परिसरात सुयेश पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. रात्री उशिरा सुयश पाटील सिडको परिसरात होते. त्याचवेळी अचानक आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने पाटील यांच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केले. सुयश पाटील यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कार्यालयाचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि तिथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि दहशतीचे वातावरण पसरले.

नाशिकमधील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुयेश पाटील यांच्यावर झालेला हा हल्ला जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झाला असेल असा संशय व्यक्त केला जात आहे. पाटील यांच्यावर हल्ला करण्यासाठी टोळके पूर्ण तयारीनिशी आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये तीन हल्लेखोर स्पष्टपणे कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

Nashik Shiv Sena leader attack
सॉफ्टवेअर इंजिनिअरला फक्त ९ रूपयांची पगारवाढ, नोटीस पिरियडमुळे नोकरीही मिळेना, कॉर्पोरेटचं धक्कादायक वास्तव

सुयेश पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी नाशिक पोलिसांनी विविध पथके तयार केली आहेत. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

Nashik Shiv Sena leader attack
Mumbai crime : मुंबई हादरली! एकाच दिवशी ३ जणांची निर्घृण हत्या, एकाला तर बायकोसमोरच संपवला

सहा ते सात जणांच्या प्राणघातक हल्ल्यात शिंदे गटाचे पदाधिकारी सुयेश पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. सध्या सुयश पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सुयेश पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानंतर स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंबड पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Nashik Shiv Sena leader attack
१०-१२ वर्षे राहिल्यावर भाडेकरू घराचा मालक होतो का? काय सांगतो कायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com