Mumbai crime : मुंबई हादरली! एकाच दिवशी ३ जणांची निर्घृण हत्या, एकाला तर बायकोसमोरच संपवला

Mumbai crime news : मुंबईत एकाच दिवशी तीन निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. दादरमध्ये पत्नीसमोर नवऱ्याची हत्या, माटुंग्यात पार्किंग वादातून खून आणि खेरवाडीत धारदार शस्त्राने हल्ला.
Crime
Crime Saam tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Dadar matunga murder case accused details : एकाच दिवशी तीन हत्यांनी मुंबई हादरली आहे. मुंबईत दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात पूर्व वैमन्यसातून तीन हत्या झाल्याचे समोर आले. मुंबई पोलिसांकडून या तिन्ही प्रकाराचा तपास केला जात आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून घेत आहे. दादर आणि माटुंगासारख्या भागात असा प्रकार घडल्याने मुंबईमध्ये खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

बायकोसमोर नवऱ्याची हत्या -

दादरमध्ये पूर्व वैमन्यसातून ७ जणांनी एका व्यक्तीची पत्नीसमोर बेदम मारहाण करून हत्या केली. अंकुश आंबेकर असे या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमन्यसातून अंकूश याचा गौरव सनस याच्याशी वाद होता. याच वादातून रविवारी अंकुश हा आपल्या पत्नीसोबत मित्र भूपेंद्र सोलंकी याला भेटायला जात होता. गौरव सनस, अनिल पटेल, राजेश पटेल, सिद्धेश पटेल, साहिल राणे, अविनाश खवरे, अजय यादव या आरोपींनी अंकुशची नको सयाजी वाडी येथे वाट अडवली. आरोपींनी अंकूशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अंकुश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारा करता परळच्या के ई एम रुग्णालयात नेले होते. पण उपचारा दरम्यान अंकुशराव मृत्यू झाला. अंकुशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून ७ आरोपींना अटक केली आहे, तर इतर ३ आरोपांचा शोध सुरू आहे

Crime
मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

पार्किंगच्या वादात एकाला संपवले -

माटुंगा येथे गाडी पार्किॅगचा वाद विकोपाला केल्याने दोघांनी नरेश वाघेला या ज्येष्ठ नागरिकांची हत्या केली. दादर टाटा येथील ब्रिजखाली वाहन उभी करू नये, यासाठी वाघेला हे आरोपीला सांगण्यास गेले होते. आरोपी साहिल घाडगे आणि शाहबाज मो रफिक शेख या दोघांशी वाघेला यांचा शाब्दिक वाद झाला. यावेळी वाघेला यांच्यासोबत त्यांची पत्नी सविता याही होत्या, अचानकपणे दोन्ही आरोपींनी वाघेला यांना मारहाण करत आरोपींनी पळ काढला. या मारहाणीत वाघेला हे गंभीर झाले, त्यांना उपचारांसाठी परळच्या के ई एम रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी वाघेला यांना मृत घोषित केले.

Crime
१०-१२ वर्षे राहिल्यावर भाडेकरू घराचा मालक होतो का? काय सांगतो कायदा?

खेरवाडीत एकाची हत्या -

खेरवाडीत पूर्व वैमन्यसातून एकावर धारधार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना समोर आली. जुन्या शाब्दिक वादातून खेरवाडीच्या कल्पतरू स्पार्कल्स येथे अभिनव चौधरी यांची हत्या दोन अज्ञात व्यक्तींनी केली. या प्रकरणी अभिनवच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खेरवाडीपोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Crime
एक्सप्रेसवेवर प्रवासी बस केमिकल टँकरला धडकली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ३० गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com