एक्सप्रेसवेवर प्रवासी बस केमिकल टँकरला धडकली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ३० गंभीर

Delhi Mumbai Expressway accident : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अलवर येथे प्रवासी बस आणि केमिकल टँकरमध्ये भीषण अपघात होऊन ४ जणांचा मृत्यू तर ३० हून अधिक जखमी झाले. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून कारणांचा तपास सुरू आहे.
Delhi Mumbai Expressway accident
Delhi Mumbai Expressway accidentSaam
Published On

Delhi-Mumbai Expressway Update News : दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आणि केमिकल टँकरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३० जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर राजस्थानमधील अलवर येथे भयंकर अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. जखमी लोकांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिकांनी सांगितलेय.

अलवर जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका प्रवासी बसची केमिकलने भरलेल्या ट्रकसोबत भीषण धडक झाली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील चॅनल १०० इंटरचेंज पुलाजवळ घडली. रायथी पोलीस ठाण्याचे एसएचओ बनय सिंग यांनी सांगितले की, केमिकलने भरलेला टँकरची प्रवासी बससोबत धडक झाल्याने ४ जणांचा मृत्यू झालाय.

Delhi Mumbai Expressway accident
मोठी बातमी! महादेव दर्शनाचा काळाबाजार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक

अपघाताची माहिती मिळताच, एनएचएआयचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेने पिनान येथील आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी पाठवले. बस आणि टँकरची धडक इतकी भीषण होती की बसमधील ३० प्रवासी जखमी झाले. बस चालक, एक महिला आणि २ मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या रूग्णालयात पाठवले आहेत.

Delhi Mumbai Expressway accident
पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती, कायदा मोडला तर थेट कारवाई, वाचा नेमका नियम काय?

अपघात झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप अपघातामधील जखमींनी केलाय. पोलीस उशिरा आल्याने स्थानिक आणि प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे अपघात झाला असावा असा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे.

Delhi Mumbai Expressway accident
BCom च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीचं नाव; ५ वर्षांच्या रिलेशनशीपमध्ये नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com