

Love Affair Suicide Case : बेंगळुरूमध्ये एका २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुण बी.कॉम पदवीधर आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने आपल्या मृत्यूसाठी प्रेयसीला जबाबदार धरलं आहे. तरूणाने सुसाईडनोटमध्ये गर्लफ्रेंडच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव अभिषेक असे आहे. अभिषेक आणि त्याची प्रेयसी मागील ५ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, असं काय घडलं की पाच वर्षांच्या या नात्याचा असा करुण शेवट झाला? सुसाईड नोटमध्ये तरुणाने नेमके कोणते आरोप केले? पोलीस याप्रकरणी काय कारवाई करत आहेत.
बेंगळुरूमधील येलहंका न्यू टाऊनमधील अटूर लेआउट येथे अभिषेकने टोकाचा निर्णय घतला. अभिषेक याने ९ एप्रिल रोजी गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप करणारी एक चिठ्ठी लिहिली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. गर्लफ्रेंडने विश्वासघात केल्यामुळे मयत अभिषेक नैराश्यात होता. त्याने शेवटच्या चिठ्ठीत तसा उल्लेख केला आहे. अभिषेकच्या आत्महत्यानंतर कॉलेजमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाच वर्षांच्या प्रेमाचा असा भयंकर शेवट झाल्याने अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.
पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की अभिषेक मागील पाच ते सात वर्षांपासून एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये खटके उडत होते. त्यामुळे अभिषेक नैराश्यात गेल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. अभिषेकने आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्याशिवाय अभिषेकचा शेवटचा मेसेजही पोलिसांना मिळालाय.
एका महिलेच्या प्रेमात अभिषेक आकंठ बुडाला होता. पण त्या महिलेने अचानक अभिषेकसोबतचे सर्व संबंध तोडले. अभिषेकने आपल्या मोठ्या भावाची आणि मित्रांची माफी मागितली. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,अभिषेकसोबतच्या रिलेशनशीपबद्दल त्या महिलेच्या कुटुंबाला समजले होते. महिलेच्या कुटुंबाकडून या नात्याला विरोध केला जात होता. त्यामुळे महिलेने अभिषेकसोबतचे संबंध तोडले. पण अभिषेक तिचा पाठलाग करत होता. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांतही तक्रार दिली होती. पोलिसांनी समजूत घालून सोडून दिले होते. पण नैराश्यात गेलेल्या अभिषेकने टोकाचे पाऊल उचलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.