Gold Rate Today : मोठी बातमी! चांदी ४ हजारांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील दागिन्याची किंमत?

Jalgaon bullion market gold silver price update : जागतिक बाजारातील घडामोडींमुळे जळगावमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दरही प्रति किलो ४ हजारांनी कमी झाले आहेत.
Gold Rate : खरेदीची सुवर्णसंधी
Gold Silver Today RateSaam Tv
Published On

संजय महाजन | जळगाव प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

gold price drop in Jalgaon today per tola rate : गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला होती. पण आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा १९१० रूपयांची वाढ झाली होती. तर चांदी प्रति किलो दहा हजार रूपयांनी महागली होती. पण या आठवड्याच्या सुरूवातीलाच सोनं आणि चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर मार्केटसह सराफा बाजारातही मोठी पडझड झाली आहे. जळगावमधील सराफाबाजार ते मुंबई, पुणे आणि दिल्ली, चेन्नईतही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

जळगावात सोनं किती झालं स्वस्त?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा दिलेल्या धमकीनंतर जागतिक बाजारात हाहाकार उडाला. कच्च्या तेलाच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढल्या. त्याशिवाय शेअर मार्केटही कोसळले. याचा परिणाम सोन्याच्या दरावरही झाला. सोमवारी सकाळी सराफा बाजार उघडताच २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमती धडाम झाल्या. जळगावमध्ये सोन्याची किंमत प्रति तोळा १ हजार रूपयांनी घसरली. तर चांदीची किंमत प्रति किलो ४ हजार रूपयांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले.

Gold Rate : खरेदीची सुवर्णसंधी
एमपीएससी भरती प्रक्रियेत बदल, मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

प्रति तोळा सोन्याची किंमत किती ?

सोमवारी सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत प्रति तोळा एक हजार रूपयांनी कमी झाली. जळगावमध्ये आज सोन्याची किंमत प्रति तोळा एक लाख ५० हजार रूपये इतकी झाली आहे. शनिवारी मार्केट बंद झाले तेव्हा सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५१ हजार रूपये इतकी होती. जीएसटीसह आज सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५४ हजार रूपये इतकी आहे.

Gold Rate : खरेदीची सुवर्णसंधी
Kalyan Accident : कल्याणमध्ये प्रवासी कारचा भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू, नावं आली समोर

चांदीचे दर काय आहेत?

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्यापेक्षा जास्त चांदीने रिटर्न दिल्याची गुंतवणूकदार सांगत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली जात आहे. आज सराफा बाजार उघडला तेव्हा चांदीची किंमत प्रति किलो ४ हजार रूपयांनी कमी झाली. आज मार्केटमध्ये चांदीची किंमत प्रति किलो 2२ लाख ४२ हजार रूपये इतकी आहे. शनिवारी चांदीची किंमत प्रति किलो २ लाख ४५ हजार रूपये इतकी होती. जीएसटीसह आज चांदीची किंमत २ लाख ४८ हजार ३०० रूपये इतकी आहे.

Gold Rate : खरेदीची सुवर्णसंधी
बीडमध्ये नेमकं चाललंय काय? मुलासमोरच बापाचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com