मुंबईत अर्धनग्न अवस्थेत नशा, ड्रग्ज पार्टीचे 'कल्याण कनेक्शन'; नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

NESCO Drug Party video : मुंबईतील नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणात कल्याण कनेक्शन समोर आले असून एमडीएमए ओव्हरडोस, अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ आणि पोलिसांची मोठी कारवाई यामुळे खळबळ उडाली आहे.
Mumbai NESCO Drug Party Case Update Video
Mumbai NESCO Drug Party Case Update VideoSaam
Published On

संघर्ष गांगुर्डे/संजय गडदे | साम टीव्ही प्रतिनिधी

Mumbai NESCO Drug Party Case Update Video : मुंबईतील 'नेस्को' (NESCO) सेंटरमध्ये झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या पार्टीला ड्रग्ज पुरवठा केल्याच्या संशयावरून आनंद पटेल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कल्याणमधील वायले नगर परिसरातील त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा आनंद पटेल हा घरातच होता; मात्र त्याने दरवाजा उघडण्यास टाळाटाळ केल्यामुळे पोलिसांना तो उघडण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.

खडकपाडा पोलिसांनी या कारवाईत आनंद पटेलला ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नेस्को सेंटरमधील या ड्रग्ज पार्टीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात कल्याणमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Mumbai NESCO Drug Party Case Update Video
१०-१२ वर्षे राहिल्यावर भाडेकरू घराचा मालक होतो का? काय सांगतो कायदा?

नेस्कोमधील धक्कादायक व्हिडिओ समोर

गोरेगाव येथील नेस्को (NESCO) सेंटरमध्ये पार पडलेल्या कॉन्सर्टमधील काही खळबळजनक व्हिडिओ आता समोर आले आहेत. या पार्टीनंतर पार्किंग परिसरात काही तरुण-तरुणी अर्धनग्न अवस्थेत नशा करताना या व्हिडिओंमध्ये दिसत असून, काही जण दारू आणि सिगारेटचे सेवन करत असल्याचेही समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या इव्हेंटला आलेल्या अनेकांनी नशेतच वाहन चालवल्याचा (ड्रिंक अँड ड्राईव्ह) संशय व्यक्त केला जात आहे.

Mumbai NESCO Drug Party Case Update Video
एक्सप्रेसवेवर प्रवासी बस केमिकल टँकरला धडकली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ३० गंभीर

ड्रग्ज कुठून मिळाले?

या प्रकरणाच्या तपासात आता 'जेबी' कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नाव समोर आले असून सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी इव्हेंटला येताना कॅबमध्येच 'एमडीएमए' (MDMA) नावाच्या ड्रग्जच्या गोळ्या घेतल्या होत्या. यातील काही विद्यार्थ्यांनी दोन गोळ्यांचे सेवन केल्यामुळे त्यांना ओव्हरडोस झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली. तपासादरम्यान हे ड्रग्ज कल्याण परिसरातून मागवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai NESCO Drug Party Case Update Video
पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती, कायदा मोडला तर थेट कारवाई, वाचा नेमका नियम काय?

५ जणांना बेड्या -

वनराई पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्रे फिरवत नेस्कोशी संबंधित ३ जण, एक सुरक्षा रक्षक आणि २ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. आरोपींकडून ६ ते ७ ड्रग्ज टॅबलेट्स जप्त करण्यात आल्या असून, ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात १५ ते १६ विद्यार्थ्यांचा सहभाग असण्याची प्राथमिक माहिती असून पोलीस आता या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

Mumbai NESCO Drug Party Case Update Video
Mumbai drug case : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; ५ जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com