

Mumbai live concert drug overdose case Goregaon Nesco details : मुंबईतील एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून ड्रग्जचे जाळे थेट कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. शनिवारी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे; त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण आहे. ११ एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक इव्हेंटदरम्यान ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
गुरुवारी, ११ एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या म्युझिक इव्हेंटदरम्यान ड्रग्ज ओव्हरडोसची धक्कादायक घटना घडली. ड्रग ओव्हरडोसने २ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांना नेमका कोणता ड्रग देण्यात आला आणि तो कोणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही; याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मृतांना नशिल्या पदार्थांचे सेवन करायला देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका इव्हेंटशी संबंधित व्यक्तीचा समावेश आहे. १३ एप्रिल २०२६ रोजी नेस्कोचे व्हाइस प्रेसिडेंट (इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.