Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, १५ जखमी

Punjab bus accident news : पंजाबमधील फतेहगड साहिब येथे भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला असून ६ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत.
Punjab bus accident news
Punjab bus accident news
Published On

Punjab Fatehgarh Sahib Bus Accident death Toll : पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यात एका भीषण अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झालाय, तर १५ जण जखमी झाले आहेत. बस्सीपठाणा शहराजवळ ३५ भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजतेय. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, आनंदपूर साहिबला भेट देऊन भाविक घराकडे परत येत होते. बसमध्ये ३० ते ३५ यात्रेकरू होते. बस्सीपठाणा परिसराजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती उलटली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आरडाओरड आणि वेदनेने विव्हळण्याचे आवाज येऊ लागले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढले आणि पोलीस व रुग्णवाहिकेला माहिती दिली.

Punjab bus accident news
आताची सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाल. तात्काळ जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहेत. त्याशिवाय मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ अन् महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.

Punjab bus accident news
Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस भरधाव वेगात होती आणि अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप पोलिसांकडून सांगण्यात आलेले नाही. पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे? हे याचा तपास केला जात आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जखमींवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत.

Punjab bus accident news
Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com