Buldhana stabbing case, Nashik murder update : १४ एप्रिल रोजी राज्यात उत्साहत भीम जयंती साजरी करण्यात आली. पण भीम जयंतीला झालेल्या २ हत्याने महाराष्ट्र हादरला. बुलढाणा आणि नाशिकमध्ये भीम जयंतीच्या उत्साहात २ जणांची हत्या झाली. बुलढाण्यात रॅलीनंतर घात लावून पप्पू याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पप्पू याचा मृत्यू झाला तर नाशिकमध्ये तरुणाच्या डोक्यात सीमेंट ब्लॉकने वार करून निर्घृण खून केला. या दोन हत्याकांडाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रॅलीनंतर घात लावून हल्ला; आरोपी सोनू जाधव फरार
बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये भीम जयंतीच्या रॅलीनंतर एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. कैकाडीपुरा भागातील सोनू वसंत जाधव (वय 25) याने पप्पू नावाच्या युवकावर गुप्तीने वार करत त्याची हत्या केल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक 2 मधील राशन दुकानदार पुष्पाबाई यांचा मुलगा पप्पू हा भीमजयंतीच्या रॅलीत सहभागी झाला होता. रॅली संपल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजार लाईन परिसरातील लालाजी आईस्क्रीम समोर त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. बेसावध असलेल्या पप्पूला काही कळण्याच्या आतच सोनू जाधवने त्याच्यावर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.
हल्ल्यानंतर आरोपी सोनू जाधव घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिकांनी तातडीने पप्पूला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, असून फॉरेन्सिक पथकानेही तपास सुरू केला आहे. भीम जयंतीच्या सर्व रॅली शांततेत पार पडल्या असतानाच रॅलीनंतर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या डोक्यात सीमेंट ब्लॉकने वार करून निर्घृण खून...
नाशिकच्या येवला शहरात रात्रीच्या सुमारास एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची धामधूम सुरू होती, त्याचवेळी दुसरीकडे वर्दळीच्या ठिकाण असलेल्या शनी पटांगण भागामध्ये 38 वर्षीय एकनाथ बाळकृष्ण गायकवाड (राहणार सुरेगाव) या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात सीमेंटचा ब्लॉक मारून खून केल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाची माहिती मिळताच पोलीसांना तात्काळ त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पाठवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते, मात्र रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान रात्रीच्या सुमारास हा तरुण येवल्यात कशासाठी आला होता? कोणासोबत होता? याची माहिती येवला शहर पोलीस घेत असून लवकरच आरोपीला गजाआड केले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.