आताची सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची अपडेट

Aaditya Thackeray latest news : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता असून आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती होण्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.
Aaditya Thackeray latest news
Aaditya Thackeray latest newsSaam TV Marathi
Published On

Shiv Sena Aaditya Thackeray latest news : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांची नियुक्ती बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसाठी तयार केलेल्या पदावर होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदावर निवड होऊ शकते.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी २००३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत कार्याध्यक्ष पद तयार केले होते. त्याच पदावर आता आदित्य ठाकरे यांची निवड होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ठाकरेंच्या शिवेसेनेची बैठक पार पडणार आहे, त्यामध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनाला आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होतील, अशी माहिती समोर येत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करू शकतात.

Aaditya Thackeray latest news
Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

आदित्य ठाकरे सध्या पक्षाचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कार्याध्यक्ष पद मिळाल्यास पक्षाच्या मुख्य निर्णयप्रक्रियेत आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग वाढणार आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यभर पक्ष संघटना सक्रिय करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे समजतेय.

Aaditya Thackeray latest news
Nashik : शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर ७ जणांचा कोयत्याने हल्ला, सपासप वार केल्याचा व्हिडिओ समोर

शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आदित्य ठाकरेंना पूर्ण पाठिंबा असल्याचे समजतेय. गेल्या काही काळापासून आदित्य ठाकरे फक्त मुंबईच नव्हे, तर ग्रामीण महाराष्ट्रातही सातत्याने दौरे करत आहेत. जनसंवाद यात्रा आणि विविध सभांच्या माध्यमातून त्यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम केले आहे. आदित्य ठाकरे यांची कार्यध्यक्षपदावर नियुक्ती झाली तर शिवसेना (UBT) मधील ही एक ऐतिहासिक घटना असेल. आगामी काही दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray latest news
सॉफ्टवेअर इंजिनिअरला फक्त ९ रूपयांची पगारवाढ, नोटीस पिरियडमुळे नोकरीही मिळेना, कॉर्पोरेटचं धक्कादायक वास्तव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com