Ambedkar Jayanti: आंबेडकर जंयतीला मुंबईत वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

Mumbai Traffic Advisory for 14th April Dr Babasaheb Ambedkar Jayanti: उद्या देशभरात आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत.
Mumbai Traffic
Mumbai TrafficSaam Tv
Published On
Summary

उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

मुंबईतील काही रस्ते बंद राहणार

या रस्त्यांवरील वाहतूक वळवणार

उद्या देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ जयंती आहे. यामुळे लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. १३ आणि १४ एप्रिलला लाखो अनुयायी येथे उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतूकीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

Mumbai Traffic
Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' रस्ते मंगळवारी बंद; वाचा पर्यायी मार्ग

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते. याचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूकीत मोठा बदल केला आहे. चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी होऊ शकते, त्याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी डीसीपी डॉ. दिपाली थाटे यांनी तात्पुरता वाहतूक नियमन आदेश आणि अधिसूचना जारी केल्या आहेत.

आदेशानुसार, चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात ११ वाजल्यापासून ते १४ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत नियंत्रित केली जाईल. प्रवाशांना आधीच परिस्थितीचा आढाव घेऊन मगच प्रवास करण्यास सांगितले आहे. उद्या अनेक रस्ते बंद असणार आहेत.

बंद असलेले रस्ते (These Roads Closed on Ambedkar Jayanti)

  • एस.के. बोले रस्ता सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्चेपर्यंत एकेरी वाहतूक सुरु असेल.

  • सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शनपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल. स्थानिक रहिवासी रस्ता क्रमांक ५ किंवा पांडुरंग नाईक मार्गाचा वापर करु शकतात.

  • रानडे रस्ता बंद राहील

  • ज्ञानेश्वर मंदिर रस्ता, एसव्हीएस रोडवरील जंक्शन ते दादर चौपाटी सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद असणार आहे.

  • सर्व अवजड वाहने, मालवाहू वाहने माहीम जंक्शनवरुन एलजे रोडमार्गे वळवण्यात येतील.

Mumbai Traffic
Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र कोणी अन् कोणत्या भाषेत लिहिलं?

या रस्त्यांवरची वाहतूक वळवणार

  • वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन साउथ मुंबईकडे येणारी वाहने कलानगर जंक्शनवर डावीकडे वळवण्यात येतील.

  • कुलाबा सीएसएमटीवरुन नॉर्थ दिशेने जाणारी वाहने पी. डी'मेलो रोड, बॅरिस्टर नाथ पै रोड, झाकेरिया बंदर रोड आणि आरएके रोडमार्गे पुढे जाऊन, नंतर माटुंगा उड्डाणपुलाखालून सायन हॉस्पिटलच्या दिशेने उजवीकडे वळू शकतात.

  • महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडून डॉ. ई. मोझेस रोडमार्गे उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांनी रखंगी चौकात उजवीकडे वळण घ्यायचे आहे. पुढे सेनापती बापट मार्गावरुन प्रवास करु शकतात.

  • ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील प्रवासासाठी वडाळा ब्रिज, बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी ओलांडून ईस्टर्न फ्रीवेमार्गे पुढे जावे.

Mumbai Traffic
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com