Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune traffic route changes: पुण्यामध्ये वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. श्री. शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आजपासून पुढील ७ दिवस हे बदल राहणार आहेत.
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv
Published On

Summary -

  • पुण्यामध्ये वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले

  • शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर ७ दिवस वाहतूक मार्गात बदल

  • २४ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल लागू

  • भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. श्री. शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ७ दिवस पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदलासंदर्भाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. प. पु. पंडीतजी श्री प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन शिरूर येथील मौजे रामलिंग रोडवर करण्यात आले आहे. त्यामुळेच वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत.

शिवमहापुराणमुळे २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिरुर ते पाबळ रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. शिरुर ते पाबळ रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मौजे रामलिंग याठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक मार्गात बदल केले असल्याचे सांगितले.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

पाबळ रोड, शिरुररोडवरुन रामलिंगकडे जाणारी वाहतूक अग्निशामक केंद्र चौक, शिरुर येथून नवीन नगरपालिका रोड-जुना अहिल्यानगर पुणे हायवे रोड-बरला आर्टस शेजारील बगाड रोड ते बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग या मार्गे रामलिंगकडे जाईल.

तर मौजे रामलिंगकडून शिरुरकडे जाणारी वाहतूक बैलगाडा शर्यत घाट चौक, रामलिंग बगाड रोड ते बरला आर्टस शेजारुन जुना पुणे- अहिल्यानगर महामार्गाला मिळून शिरुरमध्ये जाईल. भक्तगणानी आपली वाहने वाहनतळ ठिकाणी पार्क करुन कार्यक्रम स्थळी पायी चालत जावे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, पुण्यामध्ये वाहतूक मार्गात ७ दिवस मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com