Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Shiv Jayanti road closures Pune list : छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडी परिसरात वाहतूक बदल लागू. पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv
Published On

Pune Traffic Update Today : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त आज पुणे शहरात ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून प्रशासनाने वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग खुले केले आहेत.(Pune traffic diversion routes today)

नेमका बदल काय? पर्यायी मार्ग कोणते?

शहराच्या मध्यभागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी रस्त्याने स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहन चालकाने जंगली महाराज रस्ता सर्व बर्वे चौक टिळक रस्त्याने पर्यायी मार्ग दिला आहे. गणेश रस्ता जिजामाता चौक वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दारूवाला पूल मार्गाने नागरिकांनी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केळकर रस्त्यावरील आप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक ओळखण्यात आली आहे लक्ष्मी रस्त्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

पोलिसांनी नेमकं काय सांगितले ?

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी सात पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

हिंजवडीत वाहतुकीत नेमका काय बदल?

कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मारुंजी वाय जंक्शन चौकाकडून कस्तुरी चौकमार्गे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहने कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळून विनोदे वस्ती मार्गे डावीकडे वळून इंडियन ऑईल चौक मार्गे जातील. तसेच मेझा-९ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडीयन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जातील. - छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून यू-टर्न घेऊन जांभूळकर जीम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने जांभूळकर जीम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जातील. मेझा-९ चौकाकडून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक ही उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Rajya Sabha Election :राज्यातील ७ जागांसाठी निवडणूक; मतदान किती तारखेला? पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com