

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी सुसाट
मुंबई पुणे मिसिंग लिंक या दिवशी होणार सुरु
२०-२५ मिनिटांचा वेळ वाचणार
मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी वाचणार आहे.
या तारखेपासून होणार मिसिंग लिंक सुरू (Mumbai Pune Missing Link Started on These Date)
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक हा १ मेपासून सुरु होणार आहे. मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वास येत आहे. हा मिसिंग लिंक सुरु होणार असला तरीही अनेक वाहनांना यामध्ये जाण्यासाठी प्रवेश नसेल. बोगद्यातून ज्वलनशील, अतिज्वलनशील इंधनाची किंवा घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश नसेल.
मिसिंग लिंकवर या वाहनांना बंदी
मिसिंग लिंकच्या बोगद्याचा समावेश आंतरराष्ट्रीय एडीआरमध्ये झाला आहे.त्यानुसार ज्वलनशील इंधनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यामध्ये प्रवेश नाकारा जाईल. मिसिंग लिंकवरील बोगदा १० किलोमीटर लांब असणार आहे. या बोगद्यात स्फोटक पदार्थांमुळे धोका निर्माण होऊ शकते. त्यामुळे या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काही दिवसांपूर्वीच गॅस घेऊन जाणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.या मार्गावर जवळपास ३२ तास वाहतूक कोंडी होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. अशी समस्या पुन्हा होऊ नये, म्हणून मिसिंग लिंकवरील बोगद्यात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.यासाठी पोलिसांकडून वाहनचालकांना सूचना देण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.