Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लोणावळ्यात जॅम, ताम्हिणी घाटातही वाहनांच्या रांगा

Mumbai Pune Expressway traffic jam today : ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई–पुणे एक्सप्रेस वे, लोणावळा घाट आणि ताम्हिणी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai Pune Expressway Traffic Jam at Lonavala
Mumbai Pune Expressway Traffic Jam at LonavalaSaam TV marahi
Published On

Mumbai Pune Expressway Traffic Jam at Lonavala : ख्रिसमस आणि 31st आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणेकर सज्ज झाले आहेत. शाळा, ऑफिसला सुट्ट्या असल्याने कुटुंबासोबत अन् मित्रांसोबत फिरण्याचे बेत आखले गेलेत. मुंबई आणि पुण्यापासून जवळच्या लोकेशनवर धमाल-मस्ती करण्यासाठी पुणेकर अन् मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर विकेंडला गर्दी वाढली आहे. मुंबई आणि पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसतेय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Lonavala ghat traffic update Christmas weekend) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी -

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाताळचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने या महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. लोणावळा परिसरात जुण्या मुंबई पुणे महामार्गावर ही कोंडी अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. लोणावळ्याच्या घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. १० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागत असल्याचे चित्र आहे.

Mumbai Pune Expressway Traffic Jam at Lonavala
Bus Accident : हायवेवर अग्नितांडव! कंटेनरनं स्लीपर बसला उडवले, गाढ झोपेत असलेल्या १७ जणांचा कोळसा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ लोणावळा घाटात दाखल झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काम वेगात सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway Traffic Jam at Lonavala
Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?

ताम्हिणी घाट अन् नाशिककडेही वाहनांच्या रांगा -

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेतच. त्याशिवाय ताम्हिणी घाटात आणि नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही वाहतूक जॅम झाली आहे. रायगड पुणे जोडणारा ताम्हिणी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वातगतासाठी पुणेकर पर्यटक कोकणात निघाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून रायगडच्या दिशेने जाणाऱ्या ताम्हिणी घाटाच्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्याशिवाय नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही वाहतूककोंडी झाल्याचे समजतेय. पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Mumbai Pune Expressway Traffic Jam at Lonavala
Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com